शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:39 IST

अन्य वस्तूंच्याही किमती वाढल्या : सर्वसामान्यांकडून तक्रारींचा सूर

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : इंधनाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. मागील चार महिन्यांत इंधनाच्या किमतीतील वृद्धीने अन्य वस्तूंचे दर वाढून महिन्याचे आर्थिक वेळापत्रक कोलमडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून तक्रारीचा सूर उमटत आहे. दरम्यान, सातत्याने इंधन दरवाढीबाबत शासनाने तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.महाराष्ट्र आणि गुजरात तसेच केंद्रशासित प्रदेशातील इंधनाच्या प्रतिलिटरच्या दरातील तफावतीमुळे राज्य शासनाविरोधातील तक्रारीचा सूर नागरिकांमध्ये वाढत आहे. मागील चार महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. दरम्यान, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत पेट्रोल व डिझेलच्या प्रतिलिटरच्या किमतीत वृद्धी झाली आहे.नोव्हेंबर महिन्यातील पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर ८८.२९, तर डिझेल ७६.२१ रुपये होता. डिसेंबर महिन्यात पेट्रोल ८९.६०, डिझेल ७८.३२ दर झाला. महिन्याभरात पेट्रोलच्या दरात ०.६९ पैसे, तर डिझेलच्या दरात २ रुपये ११ पैशांनी वाढ झाली. २१व्या शतकातील नव्या दशकाच्या प्रारंभी १ जानेवारी रोजी पेट्रोल ९०.८४ आणि डिझेल ७९.७७ वर पोहोचले. डिसेंबर महिन्यातील दरापेक्षा जानेवारी महिन्यात पेट्रोलच्या किमतीत १ रुपया २४ पैशांनी वाढ झाली. डिझेल दरात १ रुपया ४५ पैशांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दर ९३.२७ आणि डिझेल ८२.४१ रुपयांवर पोहोचले. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत पेट्रोल २ रुपये ४३ पैशांनी, तर डिझेल २ रुपये ६४ पैशांनी महाग झाले. दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी काही वर्षांच्या तुलनेत मोठी मजल मारली असून, आजचे दर ९४.१४ रुपये झाले आहेत, तर डिझेलने ८३.३६ रुपयांचा आकडा गाठला आहे.१ नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत आजचे दर हे पेट्रोल ५ रुपये आणि ८५ पैशांनी, तर डिझेल दरात ७ रुपये १५ पैशांनी उसळी घेतली आहे. सामान्यांना हे दर परवडणारे नसल्याने, वाढत्या महागाईच्या काळात जगायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे.दिवसेंदिवस इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक वेळापत्रक सांभाळणे कठीण झाले आहे. यावर तोडगा काढलाच पाहिजे.- उमेश चुरी, नागरिक, डहाणूसर्वसामान्यांना आता स्वत:चे वाहन वापरणे अशक्य होणार आहे. सार्वजनिक परिवहन सेवेचा लाभ घेऊन काहीअंशी दिलासा मिळेलही, मात्र हा इलाज नव्हे. इंधनाच्या किमतीतील वाढ खिशाला कात्री लावणारी आहे.- राकेश सावे, नागरिक, बोर्डी

टॅग्स :Petrolपेट्रोल