शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भेकरवाडीतील जिल्हा परिषदेची शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:07 IST

विद्यार्थ्यांना आश्रमशाळेचा आधार; जिल्हा परिषदेचा उदासीन कारभार

पनवेल : पनवेल तालुक्यातील भेकरवाडी आदिवासी वाडीतील जिल्हा परिषद रायगडची मराठी शाळा पटसंख्येच्या अभावी बंद पडली आहे. वर्षभरापासून शाळा बंद पडल्याने येथील विद्यार्थ्यांना आदिवासी आश्रमशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे, तर अनेक विद्यार्थ्यांनी घरीच थांबणे पसंत केले आहे.पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्या शाळा बंद पडल्या आहेत. घसरती पटसंख्या हे कारण यामागे सांगितले असले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा उदासीन कारभार या गोष्टीला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.भेकरवाडी आदिवासी वाडीतील लहान मुलांना अंगणवाडीसाठी देखील मुकावे लागत आहे. येथील पालकांची इच्छा आहे येथील शाळा नव्याने सुरू व्हावी, जेणेकरून लहान मुलांना बालवाडीत तरी जाता येईल. मात्र, जिल्हा परिषदेमार्फत कोणतीच पावले उचलली जात नाहीत.खारघर येथील धामोळे शाळाही बंदभेकरवाडी येथील लोकसंख्या ३०० च्या आसपास आहे. तळोजा एमआयडीसीमधील डोंगरकपारीत हे गाव वसलेले आहे. पहिले ते चौथीपर्यंत शाळा याठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू होती. खारघर शहरातील धामोळे आदिवासी वाडीतील शाळा देखील अशाच प्रकारे बंद पडली आहे

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण