शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसची एनएमएमटीला धडक

By admin | Updated: November 24, 2015 02:01 IST

सेंट झेवियर्स शाळेची स्कूल बस समोरच्या बसला धडकल्याने अपघात झाल्याची घटना सोमवारी ठाणे-बेलापूर मार्गावर घडली

नवी मुंबई : सेंट झेवियर्स शाळेची स्कूल बस समोरच्या बसला धडकल्याने अपघात झाल्याची घटना सोमवारी ठाणे - बेलापूर मार्गावर घडली. या घटनेत एका रिक्षा चालकासह एका विद्यार्थ्याला दुखापत झाली आहे. स्कूल बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते.ऐरोली येथील सेंट झेवियर्स शाळेची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेवून जात असताना हा अपघात झाला. ठाणे - बेलापूर मार्गावर भारत बिजलीलगत स्कूल बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ही बस समोरून चाललेल्या एनएमएमटीला पाठीमागून धडकली. यानंतर तिथूनच चाललेल्या रिक्षालाही बसची धडक बसल्याने रिक्षाही रस्त्याबाहेर ढकलली गेली. या अपघातात सुदैवाने थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. स्कूल बस समोरच्या बसवर धडकल्याने बसमधील एका विद्यार्थ्याला दुखापत झाली असून इतर काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर रिक्षाचालक रहिम खान हा देखील जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघातामध्ये स्कूल बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्कूल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अपघाताचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी सांगितले. स्कूल बसच्या सुरक्षेचा प्रश्न यापूर्वीही चर्चेचा विषय बनलेला आहे. काही दिवसांपूर्वीच नेरुळ येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या स्कूल बसला आग लागल्याची घटना घडली होती. मात्र रात्रीच्या वेळी बस मोकळ्या जागेत उभी असताना ही घटना घडल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली होती. (प्रतिनिधी)