शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची घंटा वाजणार, मात्र व्यवस्थापनांना फुटणार घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 02:47 IST

काेराेना नियमांचे उल्लंघन झाल्यास हातावर भेटणार छडी

आविष्कार देसाईलोकमत न्यूज नेटवर्करायगड : काेराेनाच्या नियमांचे पालन करताना दरराेज किमान दाेन हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड शाळांना बसणार आहे. काेराेनाचे नियम किती दिवस राहणार आहेत, याची माहिची काेणालाच नाही. त्यामुळे हे असेच सुरू राहिल्यास लाखाे रुपयांचा फटका शाळा व्यवस्थापनांना बसणार असल्याचे चित्र आहे. काेराेना नियमांच्या पालनामध्ये काही त्रुटी राहिल्यास सरकारकडून नियमांची छडी हातावर बसणार असल्याने शाळा व्यवस्थापन हवालदिल झाले आहेत.

काेराेनाच्या जागतिक महामारीमुळे अवघ्या जगाला चांगलाच माेठा तडाखा बसला आहे. लाखाे नागरिकांचा यामध्ये बळी गेला आहे. त्यामुळे काेराेना विषाणूचा धसका सर्वांनीच घेतला हाेता. काेराेनापासून वाचविण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने विविध स्तरांवर उपाययाेजना केल्या. गेल्या काही दिवांसापासून काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताना दिसत आहे. याच कारणाने विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. त्यानुसार, मिशन बिगेन अगेन अंतर्गंत टप्प्यप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात येत आहेत. गेल्या साडेचार वर्षांपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले नव्हते. मात्र, आता काेराेनाचा कमी झालेला प्रभाव पाहता, सरकारने २३ नाेव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याला परवानगी दिली आहे. शाळा सुरू करताना काही अटी-शर्तींचे पालन करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत.

पहिल्या टप्प्यातच २५ हजारांचा खर्चशाळा सुरू करण्याआधी आणि नंतर शाळेतील वर्ग सॅनिटाइझ करणे बंधणकारक आहे, विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्यासाठी थर्मल गनचा वापर करावा लागणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातच किमान २५ हजार रुपयांचा खर्च हाेणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. दरराेज किमान दाेन हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. अद्यापही फी जमा झालेली नाही, तसेच हा खर्च विद्यार्थ्यांच्या माथीही मारता येणार नाही. त्यामुळे हा खर्च शाळा व्यवस्थापनांना करावा लागणार असल्याने आर्थिक फटका बसणार आहे.

सरकारने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काेराेनाचा प्रभाव कमी झाला असला, तरी काेराेना संपलेला नाही. यासाठी सरकारने काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. त्यांचे पालन करणे बंधणकारक आहे.- भाऊसाहेब थाेरात, शिक्षणाधिकारी, रायगड 

टॅग्स :Schoolशाळा