शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये केशरी रेशनकार्डचा तुटवडा

By admin | Updated: January 30, 2017 02:15 IST

पनवेल तालुका पुरवठा विभागाकडे रेशन कार्डचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत कार्ड उपलब्ध नसल्याचे कारण यंत्रणेकडून दिले जात आहे.

अरूणकुमार मेहत्रे , कळंबोलीपनवेल तालुका पुरवठा विभागाकडे रेशन कार्डचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत कार्ड उपलब्ध नसल्याचे कारण यंत्रणेकडून दिले जात आहे. असे असले तरी एजंटकडून आलेल्या अर्जाला प्राधान्य दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. याबाबत उपाययोजना आणि पारदर्शकता कधी येणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.पनवेल तालुका विस्ताराने व लोकवस्तीने मोठा असून दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढच होत आहे. शहरीबहुलबरोबरच ग्रामीण भागही मोठा असून अनेक आदिवासी वाडे- पाडे आणि इतर गावांचा यात सहभाग आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्गीयांबरोबर अल्प उत्पन्न गटातील लोकसंख्याही परिसरात मोठी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांकडून पनवेल तहसील कार्यालयात रेशन कार्डकरिता अर्ज केला जातो. याशिवाय मूळ गावातून कार्ड रद्द करून येथे शिधापत्रिका मिळावी, यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रहिवासी दाखल्यासाठीही अनेकदा रेशन कार्ड आवश्यक असते. पनवेल विभागात महिन्याला जवळपास ४०० अर्ज केशरी शिधापत्रिकेसाठी येतात. परंतु वारंवार हेलपाटे घालूनही त्यांना हे कार्ड उपलब्ध होत नाही. कार्ड संपले आहेत, चार दिवसांनी चक्कर मारा, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. परंतु महिनाभर फेऱ्या मारूनही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शेवटी कंटाळून काही जण एजंटकडून कार्ड बनवून घेत आहेत. शिधावाटप केंद्रात अडवणूक होत असल्याने नाइलाजास्तव दलालांकडे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एजंट आणि शिधावाटप विभागातील लिपिकाचे साटेलोटे असल्याने एजंटव्यतिरिक्त येणाऱ्या अर्जदारांना थाराच दिला जात नसल्याचे समोर येत आहे. पुरवठा अधिकारी आणि सह्या करण्याचे अधिकार असलेल्या अव्वल कारकून यांना अंधारात ठेवून सगळा गोलमाल केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांना केशरी कार्ड काय तर व्यवस्थित उत्तरे सुध्दा मिळत नाही. यासंदर्भात कारकून भरत गुंड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता शासनाकडूनच शिधावाटप कार्ड येत नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी तसेच शासनाला कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. मग प्रजासत्ताक दिनाच्या आधी काही जणांना कार्ड कसे दिले गेले, असा सवाल केला असता आमच्याकडे काही कार्ड ठेवले आहेत. ते अर्जंट असणाऱ्यांनाच दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. एक महिना अगोदर आम्ही हा विषय हाताळला आहे. सर्वसामान्यांना रेशन कार्ड मिळविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. मात्र दलालांमार्फत त्वरित मिळते ही खंत असल्याचे मनसेचे कामोठे शाखा अध्यक्ष अंकुश मोहिते यांनी व्यक्त केली. जलद प्रशासकीय प्रणालीच्या गप्पा एकीकडे मारल्या असताना अशा प्रकारे महिनोन्महिने केशरी कार्ड येत नसल्याबद्दल शिवसेनेचे सचिन गोडसे यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात प्रांताधिकारी व तहसीलदारांनी लक्ष घालावे, अशी मागणी गोडसे यांनी केली आहे.