शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

समाधानकारक पर्जन्यवृष्टी, मोरबे धरणाचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 02:17 IST

महानगरपालिकेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून याठिकाणी महापालिकेच्या वतीने जलपूजन करण्यात आले. समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन ४५० दशलक्ष क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण

नवी मुंबई : महानगरपालिकेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून याठिकाणी महापालिकेच्या वतीने जलपूजन करण्यात आले. समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन ४५० दशलक्ष क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण भरला असून ८८ मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत ३४०५.२०मि.मी. पावसाची नोंद झाली असून मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे.यापूर्वी २०१३ मध्ये मोरबे धरणाचा जलसाठा पूर्ण भरल्याने जलपूजन करण्यात आले होते. अशाचप्रकारे प्रत्येक वर्षी जलसाठा पूर्ण भरून जलपूजनाची संधी उपलब्ध व्हावी अशी प्रतिक्रिया महापौर सुधाकर सोनावणे आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केली. नवी मुंबईकरांनी पाण्याचे महत्त्व ओळखून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने नागरिक सुखावले आहे. पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापर करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी कपातीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते. यावेळी उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार, पाणीपुरवठा समिती सभापती अंजली वाळुंज, अ प्रभाग समिती अध्यक्ष सुरेखा नरबागे, ब प्रभाग समिती अध्यक्ष रु पाली किस्मत भगत,ड प्रभाग समिती अध्यक्ष संगीता बोºहाडे, आरोग्य समिती सभापती उषा भोईर, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे आदी उपस्थित होते.