शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सुधागडात लसीकरणासाठी नागरिकांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 23:21 IST

रात्री १२पासून प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी तरीही हाती निराशा; नागरिकांमध्ये संताप

विनोद भोईरपाली : सुधागड तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण केले जाते. पहिल्या आलेल्या ८० लोकांना टोकन दिले जाते. हे टोकन मिळविण्यासाठी १२ वाजल्यापासून लोक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी करत आहेत. मात्र, तरीही अनेकांना टोकन न मिळाल्याने त्यांना पुन्हा यावे लागत आहे. या प्रक्रियेत नियोजन व इतर बाबींसंदर्भात त्रुटी असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पालीतील शाम खंडागळे यांनी सांगितले की, पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ वाजता टोकन देण्यात येतात. पहाटे ५ वाजता टोकन घेण्यास गेलो असता ३ वाजताच ८० लोकांची नावे घेऊन कोटा पूर्ण केला गेलेला होता. हा अनागोंदी कारभार बंद झाला पाहिजे,  असे देखील शाम खंडागळे म्हणाले. ओळखीच्या माणसांना आधीच कुपनाचे वाटप केले जाते. मग लवकर येऊन रांगेत उभे राहिलेल्यांचा काय फायदा? याबाबत योग्य नियोजन केले पाहिजे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमित निंबाळकर यांनी सांगितले, तर ऋषी झा म्हणाले की, खेडेगावातून येणाऱ्या लोकांची प्रामुख्याने वृद्धांची खूप गैरसोय होते.

मी आईला घेऊन २ ते ३ वेळा फेऱ्या मारल्या. मात्र, कुपन मिळाले नाही तर एकदा व्हॅक्सिन संपले होते. त्यामुळे अजूनही लस घेता आली नाही. अशा प्रकारचे अनुभव अनेक नागरिकांचे आहेत. टोकन घेण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. टोकनसाठी गर्दी झाल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. आलेल्या सर्व लोकांना टोकन देऊन त्यांना लसीकरणाच्या तारखा दिल्या पाहिजेत. याबरोबरच एक लसीकरण झालेल्यांना पुन्हा टोकन घेण्यासाठी उभे राहण्यापेक्षा त्यांना ठरावीक तारखा द्याव्यात. लसीकरणासाठी योग्य नियोजन करावे, असे सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई