शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सलून, ब्युटी पार्लर व्यावसायिक संकटात; नवी मुंबईत ४००० जणांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:13 IST

नाभिक समाज हवालदिल; मुलांच्या शिक्षणाची चिंता

नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन केल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता अनेक छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणेसुद्धा अवघड झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलून, ब्युटीपार्लर बंद करण्याचे निर्देश दिल्यामुळे नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या आठ विभागात २९ गावांसह सुमारे ४००० सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायावर उपासमारीची वेळ आली आहे.एक वर्षभर बरेचसी आर्थिक आवक ठप्प झाल्याने घरातील जीवनावश्यक गोष्टी कशा पूर्ण करायच्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल, या पार्श्वभूमीवर सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास बंदी केल्यामुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत शासनाचे नियम पाळून व्यवसाय सुरू ठेवण्याची मेहेरबानी करून परवानगी द्यावी, अशा मागण्या सलून व्यावसायिकांनी केल्या आहेत. बहुतेक सलून व्यावसायिक केवळ याच व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत इतर कोणताही दुसरा जोडधंदा नाही. त्यामुळे घरातील कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी तसेच शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलांचा खर्च तसेच दैनंदिन खर्च यासाठी पैसा कुठून उपलब्ध करावा, याची विवंचना त्यांना आहे. हातावर पोट असलेला नाभिक समाज कोरोनामुळे पुरता अडचणीत सापडला  आहे.“सरकारने शनिवार आणि रविवारी दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे आताही ब्युटीपार्लर बंद राहणार आहेत. दुकानाचे आणि घरांचे थकीत वीज बिले, घरभाडे शाळेची फी अद्यापही पूर्ण भरता आलेली नाही. उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनीही पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर आर्थिक समस्यांना कंटाळून आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.    - प्रिया गोळे,     ब्युटीपार्लर व्यावसायिक, वाशी.कोरोना महामारीच्या काळात नाभिक समाज सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. शांत, संयमी आमचा नाभिक समाज सरकारला नेहमीच सहकार्य करीत आला आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजवर समाजाने नेहमीच स्वतःसोबत ग्राहक वर्गाचीही योग्य ती खबरदारी, काळजी घेऊन मोडकळीस आलेला आपला व्यवसाय सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.२८ जून २०२० पासून सुरू झालेला धंदा आजपर्यंत डळमळीत आहे.- नरेश गायकर, अध्यक्ष, नाभिक विकास फाउंडेशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या