शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बंदी नंतरही थर्माकॉल मखरांची विक्री, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष 

By योगेश पिंगळे | Updated: August 30, 2023 17:23 IST

हे मखर देखील पर्यावरणाला हानिकारक असून महापालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. 

नवी मुंबई : पर्यावरणाला हानिकारक असलेल्या थर्माकॉलच्या मखरावरची आणि सजावट साहित्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु शहरातील बाजारपेठांमध्ये छुप्या पद्धतीने थर्माकॉलच्या मखराची विक्री केली जात आहे. तर काही ठिकाणी थर्माकॉलच्या रूपात काहीसा बदल करून तयार करण्यात आलेल्या मखरची बाजारात खुलेआम विक्री होत आहे. हे मखर देखील पर्यावरणाला हानिकारक असून महापालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. 

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गौरी-गणपतीसाठी नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी सजावट साहित्याने दुकाने सजली असून मंदिरापासून ते मोत्याच्या माळा, इलेक्‍ट्रीक वस्तूंपर्यंत सर्वच आकर्षक वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. सजावट साहित्यामध्ये एलईडी दिव्यांच्या माळा, झुंबर, रंगीबेरंगी पताका व अन्य इलेक्‍ट्रिक आकर्षक साहित्य बाजारात झळकत आहेत. 

पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिक आणि थर्माकॉलवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. तुर्भेतील माथाडी भवन परिसरातील मार्केटमध्ये छुप्या पद्धतीने थर्माकॉलच्या मखरांची विक्री केली जात आहे. याच बाजारातील काही दुकानांमध्ये बदललेल्या रूपातील टणक थर्माकॉलची मखरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. खुलेआम पद्धतीने विक्री होणारे नवीन मखर पर्यावरणाला घातक नाहीत का? असा सवाल नागरिकांकडून केला जात असून याप्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी