शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात हेमंत नगराळे यांना सहआरोपी करा- आनंद बिद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 05:16 IST

पनवेल : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाला एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी २८ डिसेंबर रोजी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

पनवेल : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाला एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी २८ डिसेंबर रोजी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात आम्ही सप्टेंबर २०१६ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती. या भेटीत आम्हाला काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तसेच कोणतेही सहकार्य न करता उलट आम्हालाच भीती दाखविण्याचा प्रयत्न नगराळे यांनी केला. ‘या प्रकरणात तुमच्या जिवाला धोका आहे. तुम्ही सावध राहा,’ असे आयुक्तांनी आम्हाला सांगितले. पोलिसांकडे या प्रकरणात कुरुं दकर आरोपी असल्याबाबत आॅडिओ-व्हिडीओ उपलब्ध असतानाही या प्रकरणी पोलिसांनी कुरुंदकरविरोधी गुन्हा दाखल केला नव्हता. पोलीस सहकार्य करीत नसल्याने आॅक्टोबर २०१६ रोजी आम्ही न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात तपासाला गती दिली. त्यानंतर साहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर ३१ जानेवारी २०१७ रोजी अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने आम्ही १६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय मांडल्यानंतर तपासाला गती मिळाली. आम्ही ज्या वेळी पोलीस आयुक्तांना पुराव्याचे दाखले देत कुरुं दकर यांना अटक करण्याची मागणी केली, तेव्हा ते पुरावे सबळ नसल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. मात्र, याच प्रकरणी जेव्हा आम्ही न्यायालयात धाव घेतली तेव्हा या पुराव्यांच्या आधारावर आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे आनंद बिद्रे यांनी सांगितले.>तपास योग्य दिशेने सुरूअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाचा तपास अधिकारी मी नाही. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड करीत आहेत. पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनानुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी वेळोवेळी या प्रकरणाच्या तपासाची माहिती उच्च न्यायालयाला दिली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्ही डीएनए रिपोर्टची वाट पाहत आहोत, त्यानंतर या प्रकरणावर प्रकाश पडेल. हा विषय न्यायालयात असल्याने तपासातील भाग उघड करता येणार नाही, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.