शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या गरीब मराठी मुलाचा अटकेपार झेंडा; नेदरलँडमध्ये शिक्षण घेऊन मिळवली डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 10:00 IST

बुध्दीच्या जोरावर नेदरलँडमध्ये शिक्षण घेऊन मिळवली सागर आडतरावने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी

मधुकर ठाकूर

उरण : हार-गजरे विकणारी गरीब आई, रिक्षा चालणारे वडिल, सामाजिक संस्था व माजी सेना आमदार, हितचिंतकांकडून वेळोवेळी मिळालेली आर्थिक मदत आणि मेहनत, बुध्दीच्या जोरावर नेदरलँडमध्ये शिक्षण घेऊन उरणच्या सागर आडतराव या मराठी मुलाने नुकतीच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी संपादन केली आहे.गरीबीवर मात करून त्यांनी मिळविलेल्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

  उरण शहरातील बोरी येथील होणेश्वर मंदिराजवळ हे मराठी आई-वडिल दोन मुली आणि एक मुलगा असे पाच जणांचे आडतराव कुटुंब मागील ५० वर्षांपासून वास्तव्यास होते.वडिल सुरेश हे रिक्षा चालक तर आई हार-फुलांचे गजरे विकून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होती.दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत.दोन नंबरचा सागर बुध्दीने पहिल्या पासूनच हुशार.  दहावी आणि बारावीमध्ये उरण तालुक्यात सागर हा प्रथम आल्यानंतर सर्वानाच त्याच्या हुशारीची चुणूक अनुभवास आली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करताना मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान त्याने मिळविला होता.

पुढे एमई (ME) चेन्नई येथे पूर्ण करून तो पीएचडी पूर्ण करण्यासाठी नेदरलँडला गेला होता. नुकतीच त्याने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी संपादन केली आहे.गरीब आई-वडीलांच्या मेहनतीमुळे तो या यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.मात्र दुदैवाने सात वर्षांपूर्वीच वडिलांचे पक्षाघाताच्या झटक्याने निधन झाले.त्यापाठोपाठ तीन वर्षांपूर्वी त्याची आई सुरेखा ही कोवीडची बळी ठरली.  अशा कठीण परिस्थितीत उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार, माजी सेना आमदार मनोहर भोईर आणि इतर हितचिंतकांकडून वेळोवेळी मिळालेली आर्थिक मदत आणि सागर यांनी घेतलेली अपार मेहनत, बुध्दीच्या जोरावर नेदरलँडमध्ये शिक्षण घेऊन उरणच्या एका गरीब घरातील सागर आडतराव या एका मराठी मुलाने " डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी " ही पदवी मिळवली आहे.यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण करून परदेशातून पीएचडी पूर्ण करणारा तो उरण तालुक्यातील पहिला मुलगा ठरला आहे.गरीबीवर मात करून त्यांनी मिळविलेल्या सागरच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.