शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत; उमरोलीचा संपर्क पुन्हा तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:04 IST

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल परिसरात हाहाकार माजवला आहे

- मयुर तांबडेपनवेल : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल परिसरात हाहाकार माजवला आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालेले असून नागरिकाना २००५ च्या पूराची आठवण झाली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत.पाऊस विश्रांती घेत नसल्याने पनवेल शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. टपाल नाका, मुसलमान नाका, रोहिदास वाडा, महावितरण परिसर, कापड बाजार, पडघे, कोळवडी यासह ग्रामीण भागात कित्येक तास पुराचा वेढा होता.शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तालुक्यातील चिपळे येथील पूलाला पाणी लागायला काही ईंच पाण्याची गरज होती तर शांतिवन येथील पूलावरून आठवड्यात दोन वेळा पाणी गेल्याने हा पूल धोकादायक बनला असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेचा या पूलाला चिरा गेल्या असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहतूक करणारे प्रवासी यांच्या मनात धडकीच भरली आहे. पोलिसांनी व ग्रामस्थांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. पूलावरून पाणी गेल्याने डांबर निघून गेले आहे. पूलावरून वाहतुकीस बंदी आणल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. वाहने अलीकडेच थांबवून त्यांना चालत घर गाठावे लागले. याच पूलाशेजारील काही भाग खचला आहे. त्यामुळे याची डागडुजीकरणाची मागणी करण्यात येत आहे.पनवेल व परिसरात पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेलीच नाही. त्याचा फटका नागरिक व शेतकऱ्यांना बसत आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. सलग न थांबता कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वाधिक संपर्क तुटण्याचा फटका यावर्षी तालुक्यातील उमरोली या गावाला बसला आहे. तब्बल २० हून अधिक वेळा या गावाचा संपर्क तुटल्याने त्यांना रविवारी देखील घरीच बसावे लागले.उमरोली गावासाठी बांधण्यात येत असलेल्या नवीन पूलाला पावसाचे पाणी लागले होते. ग्रामीण भागातील काही रस्त्यांवर फुटभर पाणी साचलेले पाहावयास मिळाले. नेरे, हरिग्राम या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना काहींच्या वाहनांमध्ये पाणी गेल्याने वाहने बंद पडली. त्यांना ढकलत वाहने बाहेर काढावी लागली. गाढी नदीला महापूर आल्याने गाढी नदीचे पात्रही दुधडी भरून वाहत होते. पावसामुळे सकाळी कामावर जाणा?्या चाकरमान्यांचेही हाल झाले. मुसळधार पावसाने पनवेलला झोडपुन काढले आहे. अनेक बैठ्या घरात तसेच झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. त्यामुळे रहिवाशांना सामानाची हलवाहलवी करावी लागली. काहींच्या स्वयंपाक घरापर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे येथील कुटुंबीयांची त्रेधातिरपिट उडाली. संसार भिजू नये यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. त्यामुळे पनवेलमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. मध्येमध्ये पाऊस उसंत घेत असल्याने पाणी निचरत असले तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले.