शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल शहरासह ग्रामीण भागात बत्ती गुल

By admin | Updated: June 23, 2016 03:36 IST

मंगळवारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पनवेल शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला तो दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला

पनवेल : मंगळवारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पनवेल शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला तो दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे पहिल्याच पावसात पनवेल तालुक्यातील बत्ती गुल झाली होती. अद्याप पावसाला नीटशी सुरुवात देखील झाली नाही तर वीज गायब होऊ लागली आहे. ऐन पावसाळ्यात वीजपुरवठा कसा सुरळीत राहणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.पनवेल तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणकडून पाठवण्यात आलेल्या विजेच्या बिलाचा आकडा दिवसेंदिवस फुगत असून नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे. त्यात सुरळीत वीज पुरवठा करण्यात महावितरण प्रशासनाला मात्र अपयश आल्याचे वाढत्या पॉवर कट्समुळे दिसून येत आहेत. वर्षानुवर्षे जुन्या असलेल्या विजेच्या तारांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अशा वेळी अवेळी पॉवर कट्च्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पनवेल शहरात देखील विजेचा लपंडाव सुरूच आहे. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता गायब झालेली वीज पहाटे ३ वाजता आली, त्यामुळे नागरिक हैराण झाले.ग्रामीण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरु आहे. बहुतेकदा दिवसाची सुरु वात ही विजेविना होत असताना आता रात्री-अपरात्री विजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिकांची झोप खराब होत आहे. कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, कधी विजेच्या तारा तुटणे अशा अनेक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत महावितरणला संपर्क साधत तक्र ार दिली असता लाइनमन पाठवतो, आमच्याकडे माणसं कमी आहेत, अशी उत्तरे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुपारच्या वेळी वीज जात असल्याने उकाड्याने नागरिक हैराण होत असून तक्र ार केल्यानंतर तासाभराच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत होतो मात्र त्यानंतरही विजेचा लपंडाव सुरु राहतो. प्रत्यक्षात वीजवाहिन्यांची देखभाल दुरु स्ती करणे आवश्यक असताना महावितरणकडून या कामात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)