शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये वाहनचालकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 00:38 IST

शहरात नागरिकांना वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध होण्यासाठी वर्दळीच्या भागात पे अ‍ॅण्ड पार्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे;

नवी मुंबई : शहरात नागरिकांना वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध होण्यासाठी वर्दळीच्या भागात पे अ‍ॅण्ड पार्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु संबंधित ठेकेदारांकडून ठरवून देण्यात आलेल्या दरांपेक्षा जास्त आकारणी करून वाहनचालकांची लूट केली जात आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.नवी मुंबई शहराची निर्मिती करताना सिडकोने विविध सुविधांसाठी भूखंड आरक्षित ठेवले आहेत; परंतु शहरात वाढलेली वर्दळ आणि रहदारी यामुळे वाहने पार्किंगचे भूखंड अपुरे पडू लागले आहेत. रेल्वे स्थानक भागात वाहनतळासाठी आरक्षित ठेवण्यात आलेली जागाही वाहने पार्किंगसाठी अपुरी पडू लागली असून, शहरातील रेल्वे स्थानकेआणि इतर वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने विविध रस्त्यांच्या कडेला पे अ‍ॅण्डपार्कची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदर पे अ‍ॅण्ड पार्क कंत्राटदारामार्फत चालविण्यात येतात. या ठिकाणी वाहनेपार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये, यासाठी महापालिकेने अल्पदरात सुविधा उपलब्ध करून दिलीआहे.अर्ध्या तासासाठी दुचाकी वाहनांसाठी एक रु पया, तीनचाकी वाहनांसाठी दोन रु पये, चारचाकी वाहनांसाठी पाच रु पये तसेच हलकी वाणिज्य वाहनांसाठी दहा रु पये शुल्क आकारण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. याबाबतचे फलकही या ठिकाणी बसविण्यात आले असून, वाहनचालकांना देण्यात येणाºया पावत्यांवरही सदर दर छापण्यात आले आहेत.वाहन पार्किंग करून पावती घेतल्यावर गडबडीत जाणाºया वाहनचालकांची मात्र फसवणूक केली जात आहे. पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये वसुली करणाºया कंत्राटदारांच्या कामगारांकडून दुचाकी वाहनांसाठी सरसकट दहा रु पये आणि तीन आणि चारचाकी वाहनांसाठी २० रुपये शुल्क आकारले जात आहेत. नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबण्यासाठी महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.