शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

प्लॅस्टिकच्या पुनर्प्रक्रियेतून शहरात रस्त्यांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 23:26 IST

प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने पालिकेकडून रस्त्यांच्या कामात प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने पालिकेकडून रस्त्यांच्या कामात प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. राज्यात प्रथमच नवी मुंबईत हा उपक्रम राबवण्यात आल्यानंतर इतर महापालिकांनीही त्यात पुढाकार घेतला आहे, यामुळे डांबरीकरणाच्या खर्चात दहा टक्क्यांची बचत होत असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे.प्लॅस्टिकचे सहज विघटन होत नसल्याने पुनर्वापर हाच त्यावर उपयुक्त पर्याय ठरत आहे. मात्र, यामुळेही प्लॅस्टिक दैनंदिन वापरात राहणार असल्याने त्याचा पर्यावरणाला धोका कायम राहणार आहे. त्यावर पर्याय म्हणून नवी मुंबई महापालिकेने राज्यात प्रथमच रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापरकरण्याचा उपक्रम हाती घेतला.त्यानुसार तळवली येथे पहिल्यांदा त्या संकल्पनेतून रस्ता तयार करण्यात आला होता, यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक नोडमध्ये अशा प्रकारे रस्ते बनवण्याचे काम हाती घेण्यात आले.पालिका क्षेत्रात जमा होणारा दररोजचा अनेक टन कचरा तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडवर जमा केला जातो, त्यामध्ये प्लॅस्टिक कचºयाचेही प्रमाण अधिक असायचे. प्लॅस्टिकचा कचरा प्रक्रिया करून रस्त्यांच्या डांबरीकरणात वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये महापे डेपोसमोरील मार्ग, घणसोली-कोपरखैरणे दरम्यानच्या उड्डाणपुलाचा कोपरखैरणेकडील भाग, गोठीवली गावातील मार्ग आदीचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश रस्ते मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी बनवण्यात आले असून, अद्यापही ते सुस्थितीत आहेत. यावरून डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याने रस्ते दीर्घकाळ टिकताना दिसत आहेत. परिणामी, प्रतिवर्षी पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या डागडुजीवर होणाºया खर्चाला कात्री बसली आहे.>पर्यावरणाचा समतोलप्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याकरिता त्याचा रस्त्याच्या डांबरीकरणात वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात प्रथमच नवी मुंबई महापालिकेने हा उपक्रम हाती घेऊन मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचºयाचा पुनर्वापर केला.डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याने पर्यावरणाचीही हानी टळत आहे. प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या रसायनाचा डांबरात वापर होऊ लागल्याने डांबरीकरणावर होणाºया खर्चात दहा टक्क्यांची बचत झाली. दोन वर्षांपूर्वी बनवलेले प्लॅस्टिकचे रस्ते अद्यापही सुस्थितीत.>शहरातील वाढत्या प्लॅस्टिकच्या कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न भेडसावत होता, त्यावर पर्याय म्हणून रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला. यामुळे एकूण कामाच्या खर्चात दहा टक्क्यांची बचतही होत आहे. त्यानुसार प्रत्येक नोडमध्ये अशा प्रकारचे रस्ते बनवण्यात आले असून, यापुढेही काही रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत.- संजय देसाई, कार्यकारी अभियंता,नवी मुंबई महापालिका.>जुन्या-नव्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी होतोय वापरप्लॅस्टिकच्या साठ्यावर प्रक्रिया करून तयार झालेले रसायन प्रत्यक्षात रस्त्याच्या डांबरीकरणा वेळी डांबरात मिसळले जाते, त्यामुळे प्लॅस्टिकच्या कचºयाची विल्हेवाट लावणे शक्य झाले आहे. शिवाय, डांबरीकरणाच्या कामावर होणाºया एकूण खर्चातही सुमारे दहा टक्क्यांची बचतही होऊ लागली आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांत महापालिका क्षेत्रात १५ पेक्षा अधिक ठिकाणी डांबरात प्लॅस्टिकचा वापर करून नवे रस्ते अथवा जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे.