शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेला रस्त्याच्या कामांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:38 IST

बँका, खाजगी सेवांसह सरकारी कामकाजावर परिणाम

सिकंदर अनवारेदासगाव : भारत संचार निगम लिमिटेडची दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा गेल्या पाच वर्षांपासून कोलमडलेलीच आहे. सर्वांत गतीने मिळणारे बीएसएनएलचे इंटरनेट विविध रस्त्यांच्या कामात सातत्याने तोडल्या जाणाऱ्या केबलमुळे बंद पडत आहे. यामुळे बँका, खाजगी सेवा पुरवणाऱ्या संस्था, सरकारी कार्यालयांतील व्यवहार वारंवार ठप्प होत आहेत. याबाबत कोणताही राजकीय लोकप्रतिनिधी आजतागायत बीएसएनएल किंवा महामार्ग विभागाला जाब विचारण्यास पुढे आलेला नाही.

महाडसह संपूर्ण देशभरात भारत संचार निगम लिमिटेडकडून दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरवली जाते. भारत संचार निगमची इंटरनेट सेवा अत्यंत गतीने चालणारी सेवा आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून या सेवेचा चांगलाच बोजवारा उडाला आहे. मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्याने बीएसएनएल मोबाइलधारक कमालीचे संतापले आहेत. बहुतांश ग्रामीण भागात भारत संचार निगमचे मोबाइल ग्राहक आहेत. पूर्वी असलेले घरगुती दूरध्वनी जवळपास ९० टक्के बंद पडले आहेत. त्याऐवजी बीएसएनएलचा मोबाइल वापर सुरू झाला. मात्र, भारत संचार निगमच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागात या सेवेवरदेखील नाराजी व्यक्त झाली. गेल्या अनेक वर्षांपासून बीएसएनएलची सेवा सातत्याने खंडित होत असल्याने महाड शहरातील खाजगी आणि सरकारी बँकांतून सर्व कारभार ठप्प होत आहे. शिवाय सरकारी कार्यालयातील कारभारदेखील मंदावला आहे. याचा फटका व्यापारी, उद्योजक, कारखाने, खाजगी बँका आदींना बसला आहे. महामार्ग चौपदरीकरण आणि महाबळेश्वर घाटात रस्त्याचे सुरू असलेले काम यामुळे लाइन तोडली जात आहे. मात्र यावर अद्याप ठोस उपाय किंवा कार्यवाही झालेली नाही. यामुळे सातत्याने बी.एस.एन.एल.ची लाइन तुटत आहे. सदर लाइन कोणीतरी तोडत असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जात आहे.

शासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा ठप्प असल्याने विविध कामांचा खोळंबा झाला आहे. गेले काही दिवस नोंदणी कार्यालयातदेखील खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी होत नसल्याने नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. हीच अवस्था भारतीय विमा निगम कार्यालयातदेखील कायम आहे. एल.आय.सी.ची कोणतीच कामे होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. खाजगी सेवा पुरविणाऱ्या संस्थांमध्येदेखील हीच अवस्था आहे. यामुळे बीएसएनएलच्या सेवेवर नाराजी व्यक्त होत आहे.

महाड मंडळ कार्यालयात केवळ ११ कर्मचारीमहाड शहरात छोट्यामोठ्या अशा जवळपास ३५ ते ४० बँका, पतसंस्था आहेत. या बँकांमधून बीएसएनएलची इंटरनेट सेवा कार्यरत आहे. शिवाय सर्व सरकारी कार्यालये, दुकाने, खाजगी कार्यालये यातूनदेखील बीएसएनएलचेच इंटरनेट वापरले जाते. मात्र सातत्याने खंडित होत असलेल्या या सेवेमुळे ग्राहक वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. महाडमधील २१ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. यामध्ये महाड मंडळ कार्यालयातील ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर संपूर्ण रायगडमध्ये जवळपास २०० च्या वर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. याचा फटकादेखील बसला असून महाड शहरातील एका कार्यालयाला वर्षापूर्वी टाळे लागले आहे. यामुळे बिल भरणा, मोबाइल रिचार्ज आदी सुविधादेखील पुरविल्या जात नाहीत.

खाजगी कंपन्यांचीदेखील हीच स्थितीबीएसएनएल वगळता अन्य खाजगी कंपन्यांचीदेखील हीच बोंब आहे. गेले काही दिवस या खाजगी कंपन्यांचेदेखील नेट मिळत नसल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत. मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरी भागात इंटरनेट आणि इतर सुविधा सुरळीत आहेत, मात्र ग्रामीण भागातील ग्राहक तितकेच पैसे मोजूनदेखील वारंवार खंडित सेवेला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBSNLबीएसएनएल