शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मार्बल मार्केटमधील रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:46 IST

वाहन चालविणे जिकिरीचे; अवजड वाहनांमुळे रस्त्यांची चाळण

कळंबोली : कळंबोली मॅक्डॉनल्डपासून मार्बल मार्केटमधून तळोजा लिंक रोडला मिळणाऱ्या सर्विस रोडचे काम सिडकोने गेल्या वर्षी पूर्ण केले होते. वर्षभरात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्यामुळे वाहने चालवणेही जिकिरीचे बनत चालले आहे. सिडकोने याकडे लक्ष देऊन हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी व्यापारी तसेच नागरिकांकडून होत आहे.कळंबोली बाजूने कळंबोली सर्कल ते तळोजा लिंक रोड या दरम्यान अडीच कि.मी. लांबीचा सर्विस रोड कित्येक वर्षांपासून प्रस्तावित होता. त्यानुसार सिडकोने गेल्या वर्षी निविदा काढून ठेकेदारामार्फत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. कळंबोलीकरांच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्त्वाचा, रहदारीचा बनला आहे. तसेच कामोठे आणि कळंबोली वसाहतींतील अंतर या रस्त्यामुळे कमी झाले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने कळंबोलीकरांना वर्षभर दिलासा मिळाला होता; परंतु सद्यपरिस्थितीत रस्ता खड्ड्यात गेल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची खंत कळंबोलीकरांनी व्यक्त केली आहे.पनवेलच नाही तर नवी मुंबई आणि रायगडमधील सगळ्यात मोठ्या मार्बल बाजारपेठेसाठीही याच रस्त्याचा वापर केला जातो. मुंबई, ठाणे, कोकण तसेच घाटमाथ्यावरूनही माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांची वर्दळ असते. राज्यातून या मार्केटमध्ये लादी, ग्रेनाइट मार्बल आणि इतर माल येतो. मार्बल मार्केट आणि लिंक रोडवर जाण्यासाठी हा रस्ता जवळचा तसेच सुरक्षित असल्याने या रस्त्यावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. बाजूलाच पुरुषार्थ पेट्रोल पंप आहे. पेट्रोल-डिझेल भरण्याकरिता येथे चारचाकी तसेच अवजड वाहने येतात. सिडकोने सात कोटी रुपये खर्च करून डांबरीकरण केले; परंतु वर्षभरातच रस्ता खड्ड्यात गेल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे उघड झाले आहे. खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. वारंवार तक्रार करूनही सिडको याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील व्यापाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Potholeखड्डे