शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

खदाणी ठरताहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:28 IST

खारघर परिसरात पावसाळ्यात निर्माण झालेली डबकी धोकादायक ठरू लागली आहेत.

वैभव गायकरपनवेल : खारघर परिसरात पावसाळ्यात निर्माण झालेली डबकी धोकादायक ठरू लागली आहेत. पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेली ही खदाणी (डबकी) पर्यटकांना भुरळ घालत आहेत. मागील तीन दिवसांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत चार जणांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे. असे असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रविवारी खारघर येथील तळोजा कारागृहाच्या समोर असलेल्या डबक्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला, तर सोमवारी सेक्टर ३६ येथे एका बांधकाम व्यावसायिकाने खोदलेल्या खड्ड्यात बुडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे खारघर परिसरातील पावसाळी खड्डे जीवघेणे ठरू लागले आहेत. खारघर हा सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पारसिक डोंगराच्या सान्निध्यात उभारलेल्या या शहराला विपुल निसर्गसौंदर्य लाभले आहे. पावसाळ्यात येथील पांडवकडा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव पांडवकड्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि रायगडमधून येणाऱ्या हौशी पर्यटकांचा हिरमोड होत आहे. धबधब्याची मौज घेण्यासाठी दुरून आलेल्या पर्यटकांना खारघरमध्ये पावसाच्या पाण्याने तयार झालेली डबकी आकर्षित करू लागली आहेत. याच आकर्षणातून चार निष्पाप जणांचे बळी गेले आहेत.खारघरमध्ये सध्या मोठ्याप्रमणात विकासकामे सुरू आहेत. काही प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून सुरू आहेत, तर काही खासगी विकासकांचे आहेत. या विकास प्रकल्पाच्या कामासाठी मोठमोठे खड्डे खोदले आहेत. परंतु पावसामुळे या खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून संबंधित विकासकाने या ठिकाणी धोक्याचे फलक लावणे गरजेचे आहे. पाण्यात कोणी उतरू नये, यादृष्टीने डबक्याभोवती संरक्षण कुंपण लावण्याचीही गरज आहे. परंतु अनेक डबकी बेवारस असल्याने पर्यटकांना ते नैसर्गिक वाटू लागली आहेत. त्यामुळेच पांडवकडा नाही, तर या डबक्यात पोहण्याचा आनंद घेवू या भावनेतून पर्यटक त्यात उड्या मारत आहेत. हे प्रकार दरवर्षी घडत असल्याने त्यात अनेकांचे नाहक बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने कठोर उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.पावसाच्या पाण्यामुळे खारघर परिसरात ठिकठिकाणी पाणथळे निर्माण झाली आहेत. ही पाणथळे सुध्दा धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.बिल्डरांवर अंकुश ठेवण्याची गरजखारघर शहरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याकरिता अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आलेले आहेत. या खड्ड्यांमुळे काही अपघात होणार नाहीत, याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची आहे. परंतु अनेक विकासकाकडून या नियमाला हरताळ फासला जात आहे. अशा बेजबाबदार विकासकांवर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.