शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

चाचणीच्या रांगेतूनही कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:24 IST

नवी मुंबईत सामाजिक अंतराकडे दुर्लक्ष : कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेचा उपक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाच्या चाचणीसाठी लागणाऱ्या रांगांमधूनही कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. किरकोळ लक्षणांमुळे चाचणीसाठी येणाऱ्यांकडून एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता गर्दी केली जात आहे. त्यामुळे चाचणीच्या ठिकाणीही अनेकांचा संसर्ग होऊन कोरोना अधिक पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिकेकडून चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. त्याकरिता आवश्यक ठिकाणी मोफत चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नवी मुंबईतल्या रहिवासी वर्गासह नोकरी व्यवसाय निमित्ताने नवी मुंबईत येणारेही चाचणीला रांगा लावत आहेत. यामुळे प्रत्येक चाचणी केंद्रावर लांब रांगा लागत आहेत. त्यात थोडी-फार लक्षणे असलेल्यांसह कसलाही त्रास नसल्याने केवळ नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी निगेटिव्ह प्रमाणपत्राची गरज असल्याने चाचणीसाठी आलेल्यांचाही समावेश असतो. या दरम्यान लागणाऱ्या लांब रांगांमध्ये कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर ठेवले जात नाही. त्यामुळे एखाद्या कोरोना संक्रमित इतरांनाही संसर्ग पसरवू शकतो. परिणामी, त्या चाचणीत निगेटिव्ह आलेली व्यक्ती पुढीलकाही दिवसात चाचणीदरम्यान झालेल्या संसर्गामुळे बाधित होऊ शकते. अशा प्रकारातून निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन फिरणारी व्यक्तीही नकळतपणे अनेकांना संसर्ग पसरवू शकते. त्यामुळे कोरोना चाचणीच्या ठिकाणी अधिक खबरदारी घेतली जाण्याची गरज निर्माण झाली आहे, परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्याने व चाचणी केंद्राच्या ठिकाणी अपुऱ्या जागा व सुविधांमुळे तिथे येणाऱ्यांचीही गैरसोय होत असल्याने नागरिकांना गर्दी करूनच रांग लावावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेकडून होत असलेल्या चाचणीच्या वेळी चाचणीला आलेल्या व्यक्तीच्या आधार कार्डवरील पत्ता तपासला जावा, अशी मागणी होत आहे. शहराबाहेरील अधिकाधिक व्यक्ती चाचणीच्या रांगेत असल्याने स्थानिक रहिवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय निमित्ताने नवी मुंबईत येऊन चाचणी करून घेणाऱ्यांची पर्यायी सोय करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस