शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

एपीएमसीजवळील पेट्रोल पंपासमाेर रिक्षाला आग; तुर्भे-वाशी रोडवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 00:44 IST

कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

नवी मुंबई : तुर्भे-वाशी रोडवर मलनि:सारण केंद्राच्या बाजूला पेट्रोल पंपासमोर रिक्षाला आग लागली. पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्वरित आग विझविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा - बटाटा मार्केटपासून जवळ मलनि:सारण केंद्राला लागून इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल पंप आहे. 

शनिवारी सायंकाळी चार वाजता गॅस भरण्यासाठी रिक्षा पंपावर आली. गॅस भरून रिक्षा रोडवर आली असताना अचानक रिक्षाला आग लागली. रिक्षातून प्रचंड धूर येऊ लागला. पेट्रोल पंपासमाेरच ही घटना घडली असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून फायर एक्स्टींंग्वीशरच्या साहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. तसेच पंपावरील पाइपलाइनच्या साहाय्याने रिक्षावर पाण्याची फवारणी करण्यासही सुरुवात केली. काहींनी पंपावरील बादलीच्या साहाय्याने पाणी उपसण्यास सुरुवात केली. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांमध्ये आग विझविण्यात यश आले.

पेट्रोल पंप व्यवस्थापनाने अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत आग आटोक्यात आली होती. अग्निशमन दलाने पाण्याच्या फवाऱ्याने आग पूर्णपणे विझविली. दरम्यान, पंपावरील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले.

बघ्यांना जवानांनी झापलेआग लागल्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाचे वाहनही फोन केल्यानंतर तत्काळ पोहोचले. परंतु तोपर्यंत आग शमली होती. बघ्यांच्या गर्दीमधील काहींनी अग्निशमन दलाच्या जवानांना उशिरा आल्याबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांनी त्यांना झापून फोन येताच तत्काळ आम्ही कर्तव्यावर निघत असतो. बघ्याची भूमिका घेऊन टीका करीत बसत नाही, अशा शब्दांत संबंधिताला झापले.

टॅग्स :fireआग