शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

कारवाईनंतरही रिक्षाचालकांची मुजोरी; सातत्याने मोहीम राबवूनही बेशिस्तीला लगाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 00:28 IST

आरटीओकडून ६९६ जणांवर कारवाई

नवी मुंबई : रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याचे चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे. मागील नऊ महिन्यात आरटीओकडून ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर देखील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक व सिग्नल तोडणे असे प्रकार रिक्षाचालकांमद्ये पहायला मिळत आहेत.

रिक्षांचे परमीट खुले केल्यापासून शहरातील रिक्षांमध्ये मागील दोन वर्षात प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक व खासगी वाहनांपेक्षा रिक्षाच सर्वाधिक धावताना दिसत आहेत. त्यापैकी बहुतांश रिक्षाचालकांकडून वाहतुकीच्या तसेच आरटीओच्या नियमांचे उघडपने उल्लंघन होत आहे. मीटरप्रमाणे मागणी करणारे प्रवासी भाडे नाकारुन शेअर भाडे मिळवले जात आहेत. त्यामध्ये चार किंवा पाच प्रवासी रिक्षात कोंबले जात आहेत. शेअर भाड्याच्या एका फेरीत मीटरच्या भाड्यापेक्षा जास्त नफा असल्याने त्यांच्याकडून हा पर्याय निवडला जात आहे. याकरिता एनएमएमटीचे बस थांबे, महत्वाचे चौक तसेच ठिकाणी अवैध थांबे तयार करण्यात आले आहेत. त्याठिकाणी रस्त्यांवरच रिक्षा थांबवून प्रवासी भरले जात आहेत. याचा फटका महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला बसत असून, अशा ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा होत आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

परंतु अनेकदा कारवाई करुन देखील रिक्षाचालकांना शिस्त लागत नसल्याचेही पहायला मिळत आहे. वाढत्या तक्रारीमुळे आरटीओडून गतवर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. तर वाहतुक पोलिसांकडून देखिल सातत्याने कारवाईचा धडाका सुरूच असतो. यानंतरही रिक्षाचालकांना वाहतुकीचे नियम अंगवळणी पडत नसल्याचे दिसून येत आहे. आरटीओ तसेच वाहतुक पोलिसांच्या कारवाईला न जुमता त्यांच्याकडून तिन पेक्षा जास्त प्रवासी रिक्षात भरले जात आहेत. तर अती वेगात रिक्षा पळवत असताना सिग्नलही तोडले जात आहेत. यामध्ये अपघाताचा धोका असून प्रवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण होत आहे. त्यामुळे सातत्याने नियमांची पायमल्ली करणारया रिक्षाचालकांचे परवाने कायमचे रद्द करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे. परंतु आरटीओकडून ठोस कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढतच चालली आहे. काही संघटना देखील अशा रिक्षाचालकांना पाठीशी घालत असल्याने त्यांच्यापुढे आरटीओ अधिकारयांनीही हात टेकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनावर तसेच प्रवाशांमध्ये संघटनेचा दबदबा वाढवण्यासाठी अशा प्रवृत्तींना थारा दिला जात आहे. त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून घेतला जात आहे. त्यांच्याकडून रात्री अपरात्री मद्यपान अथवा इतर नशा करुन रिक्षा चालवल्या जात आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी एकट्या महिलांमध्ये रिक्षातून प्रवास करताना असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे.बेशिस्त रिक्षाचालकांना आळा घालण्यासाठी त्यांचे परवाने कायमचे रद्द केले पाहिजेत. त्याकरिता वाहतूक पोलिसांऐवजी आरटीओकडून कारवाईवर जोर दिला जाणे आवश्यक आहे, परंतु मुजोर रिक्षाचालकांवर ठोस कारवाई होत नसल्याने अप्रत्यक्षरीत्या त्यांना पाठबळ मिळत असल्याचा संशय आहे. - रमजान मुजावर, रहिवाशी, कोपरखैरणेक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, तसेच इतर कारणांनी गतवर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ६९६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७९ बसेसवरदेखील कारवाई केली आहे. यापुढेही अशा स्वरूपाच्या कारवाया सुरू राहणार आहेत, परंतु कारवाईसाठी एकच पथक असल्याने तीव्र स्वरूपाची मोहीम राबविण्यात अडथळा निर्माण होत आहे. - दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा