शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाने केली प्रवाशाची बॅग परत, नेरुळमधील चालक; प्रवाशाने मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:23 IST

नेरुळमधील शिरवणेगावातील रिक्षाचालक रूपेश पाटील यांच्या रिक्षात एका प्रवाशाची बॅग विसरली होती. या बॅगेमध्ये ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही होते. पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाला त्यांची बॅग सुखरूपरीत्या परत केली आहे.

 नवी मुंबई - नेरुळमधील शिरवणेगावातील रिक्षाचालक रूपेश पाटील यांच्या रिक्षात एका प्रवाशाची बॅग विसरली होती. या बॅगेमध्ये ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही होते. पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाला त्यांची बॅग सुखरूपरीत्या परत केली आहे. नेरुळ एलपी येथील रिक्षा स्टँडवरून गुरुवारी, ३ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सीवूड येथे जाणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तींनी पाटील यांच्या रिक्षाने प्रवास केला. प्रवाशासोबत साहित्य जास्त असल्याने त्यांनी रिक्षाच्या सीटच्या मागील बाजूसही साहित्य ठेवले होते. प्रवासी सीवूड येथे उतरल्यावर एक बॅग रिक्षाच्या सीटच्या मागील बाजूस विसरले. त्यानंतर, पाटीलही घरी परतले. दुसऱ्या दिवशी पाटील काही कामानिमित्त शहराबाहेर गेले होते. बॅग विसरल्याचे प्रवाशाच्या लक्षात आल्यावर त्यांनी रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शोध लागला नाही.शुक्रवारी एलपी येथील रिक्षा स्टॅंडवर प्रवाशाने चौकशी केली, तसेच रिक्षाचालकाचे वर्णन इतर रिक्षाचालकांना सांगितले. त्यावर रिक्षाचालकांनी प्रवाशाला धीर देत, सदर रिक्षाचालक रूपेश पाटील असण्याची शक्यता वर्तविली. प्रवासी शनिवारी, ५ डिसेंबर रोजी पाटील यांच्या घरी पोहोचले. रिक्षाच्या सीटच्या पाठीमागे जागेत बॅग असल्याचे पाटील यांच्याही लक्षात आले नव्हते. प्रवासी घरी आल्यावर पाटील यांनी रिक्षामध्ये पाहिले असता, बॅग आढळून आली. पाटील यांनी सदर बॅग प्रवाशाला परत केली. बॅगेत असलेल्या सर्व वस्तूंची खात्री करून प्रवाशाने पाटील यांचे आभार मानले.  शिरवणे गावात राहणारे रिक्षाचालक रूपेश पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई