शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलचा शहराचा सुधारित आराखडा रखडला

By admin | Updated: August 11, 2015 03:29 IST

पनवेल शहराचा नियोजन आराखडा (टीपी स्कीम) मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आली आहेत. तरीही ही योजना पनवेल नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही.

- वैभव गायकर,  पनवेल

पनवेल शहराचा नियोजन आराखडा (टीपी स्कीम) मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आली आहेत. तरीही ही योजना पनवेल नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही. नगरविकास विभागाकडे या योजनेची फाईल व अधिसूचना धूळखात पडली आहे. गेल्या तीन वर्षांपासून यासंदर्भातील सुधारित आराखडा रखडला आहे. याकरिता पालिकेने जवळपास ८५ लाख रुपये खर्च केले असून आतापर्यंत केवळ वीस टक्के काम पूर्ण झाले आहे. वाढत्या लोकसंख्येचा ताण पनवेलच्या पायाभूत सुविधांवर सध्या पडत असून रस्ते, गटारे यासारख्या सुविधांचा विस्तार आणि विकास करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता नवीन टीपी स्कीम योजनेबाबत प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. नगरविकास विभागाने १३ आॅगस्ट २००९ रोजी अधिसूचना काढली. मात्र गेल्या सहा वर्षांत ही योजना केवळ कागदावरच आहे.सुधारित आराखडा अद्याप तयार नसल्याने शहरात सुविधांची वानवा असून अनेक भूखंडाची मोजणीही झाली नाही. काही भूखंडावरील नियोजित प्रकल्प ही रखडले आहेत. पनवेल नगरपालिकेत एकूण ५३८ मूळ भूखंड असून त्यापैकी ३२५ भूखंडांचेच रेकॉर्ड पालिका आणि भूमापन विभागाकडे आहे. उर्वरित जागेची मोजणी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मूळ भूखंडाचे अंतिम भूखंडात रूपांतर करण्याकरिता टीपी स्कीम अमलात येणे आवश्यक आहे. अंतिम भूखंड असल्याशिवाय बांधकाम परवानगी मिळत नसल्याने बांधकाम व्यावसायिकही टीपी स्कीमच्या प्रतीक्षेत आहेत. भूखंड अंतिम करताना पायाभूत सुविधांचा विचार केला जातो. मात्र हेही काम रखडल्याने रस्ता रुंदीकरण, ड्रेनेज आदी समस्या जैसे थे आहेत. मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण होत असून शहरातील झोपड्या वाढत आहेत. नोव्हेंबर २०१२ पासून काम सुरूआराखड्याचे काम नोव्हेंबर २०१२ मध्ये हाती घेण्यात आले असून नगरचनाकार श्रीकांत देव यांच्या नेतृत्वाखाली अनुपमा कुमवणी, तेजल सुताडे, अरुण सुरवसे असे एकूण चार जण त्यावर काम करीत आहेत. मात्र ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. याकरीता आतापर्यंत एकूण ८५ लाख खर्च झाला आहे. मुंबई महापालिकेचा सुधारित आराखडा सुध्दा या मंडळींनी आहे.सुधारित आराखडा तयार करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. यावर जवळपास ८५ लाख रुपये खर्च झाले आहे. शहर नियोजनासाठी पैसे खर्च होऊ द्या, पण त्या बदल्यात कामही झाले पाहिजे. आजमितीस केवळ १० ते २० टक्के काम झाल्याचा आरोप नगरसेवक जयंत पगडे यांनी केला आहे. काम अतिशय संथ गतीने सुरू असून ही चारही मंडळी काय काम करतात, किती काम झाले यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचा आरोप नगरसेवक जयंत पगडे यांनी केला आहे.