शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

करंजाडेतील रिक्षाचालकांचा बससेवा सुरू करण्याला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 02:29 IST

स्थानिकांमध्ये नाराजी : ओनर्स असोसिएनशनने बससेवेची मागणी घेतली मागे

पनवेल : नव्याने विकसित होत असलेल्या सिडकोच्या करंजाडे नोडमधील रहिवासी सध्या रिक्षाचालकांच्या दादागिरीमुळे त्रस्त आहेत. करंजाडेतून खांदेश्वर रेल्वे स्थानकाकडे जाणारी बस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिकांवर आता हीच बससेवा नाकारण्याची वेळ आली आहे. रिक्षाचालकांनी बसला केलेल्या विरोधामुळे करंजाडे ओनर्स असोसिएशनने बसचा आग्रह सोडल्याचे पाहावयास मिळाले आहे.

करंजाडे नोडमध्ये नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. याठिकाणी नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने स्थानिक ओनर्स असोसिएशनने खांदेश्वर ते करंजाडे अशी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. याठिकाणी बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने एनएमएमटीने सर्वेक्षणही सुरू केले. मात्र सर्वेक्षणादरम्यान स्थानिक रिक्षाचालकांनी विरोध करून सर्वेक्षण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. बस सुरू झाल्यास स्थानिक रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे ही नवी बससेवा सुरू करायची नाही असा पवित्रा करंजाडेतील रिक्षा चालकांनी घेतला. यातून तोडगा काढण्यासाठी रविवारी रिक्षा युनियन व करंजाडे नोड ओनर्स असोसिएशन यांच्यात बैठक झाली. बैठकीत नागरिकांच्या बसवाहतुकीच्या पर्यायाला स्थानिक रिक्षाचालकांनी विरोध केला. स्थानिकांच्या विरोधामुळे करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी अखेर बससेवा सुरू करण्याची मागणी मागे घेतली. मात्र या निर्णयामुळे येथील रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

कामोठे शहरातही अशाच प्रकारे एनएमएमटी बससेवा सुरू करताना स्थानिक रिक्षा चालकांनी विरोध दर्शविला होता. यावेळी मोठा संघर्ष निर्माण झाला होता. शेवटी पोलीस बंदोबस्तात ही बससेवा सुरू करण्यात आली. यासंदर्भात सिटीझन युनिटी फोरमचे अरुण भिसे यांनी बससेवेला अशाप्रकारे कोणीही विरोध दर्शवू शकत नाही. रहिवाशांना जे सोयीचे आहे ती प्रवासी सेवा निवडणे त्यांचा हक्क असल्याचे त्यांनी सांगितले.रिक्षाचालकांनी त्यांचा व्यवसाय करावा. मात्र रहिवाशांना बससेवा आवश्यक असताना अशाप्रकारे बससेवेला विरोध करणे चुकीचे आहे. राजकीय पक्षांनी येथील रहिवाशांच्या पाठीशी उभे राहून बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.- मदन केदार, रहिवासी, करंजाडे 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाNavi Mumbaiनवी मुंबई