शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीबीडीतील आरबीआय कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 01:56 IST

घातपाताची शक्यता : प्रवेशद्वारावर बेवारस वाहनांचा खच; संबंधित प्राधिकरणाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : सीबीडीतील आरबीआयच्या कार्यालयासमोरच बेवारस वाहनांचा खच साचला आहे. यावरून रस्त्यालगतची बेवारस वाहने हटवण्यातील प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. मात्र, या प्रकारामुळे आरबीआयच्या सुरक्षेतील त्रुटी उघड होत आहेत.

शहरातील रस्त्यांलगत तसेच मोकळ्या जागेत वर्षानुवर्षे पडून राहणारी वाहने डोकेदुखी ठरत आहेत. अशा वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय, या वाहनांचा घातपातासाठीही वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अथवा एखाद्या गुन्ह्यात वापरल्यानंतर ती वाहने उभी केल्याचीही शक्यता असू शकते. सद्यस्थितीला शहराच्या प्रत्येक नोडमध्ये जागोजागी अशी भंगार अवस्थेतील संशयास्पद वाहने दिसून येत आहेत. त्यात आरबीआयच्या आवाराचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, पोलीस मुख्यालयासमोरच आरबीआयचे मुख्य कार्यालय असतानाही, त्या ठिकाणच्या बेवारस वाहनांना हटवण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मात्र, या प्रकारातून आरबीआयच्या सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष भविष्यात एखाद्या गुन्हेगारी कृत्याला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेले अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी काही वाहने संशयास्पदरीत्या उभी आहेत. विशेष म्हणजे, त्याच ठिकाणी आरबीआयच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या काही पोलिसांच्या दुचाकीही उभ्या असतात. मात्र, त्यापैकी एकालाही त्या बेवारस वाहनांचे गांभीर्य लक्षात येत नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. सद्यस्थितीला मुंबईपेक्षाही नवी मुंबईतील आरबीआयच्या कार्यालयाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. नोटाबंदीच्या काळातही ती अधिक प्रकाशात आली होती. शहरात बहुतांश ठिकाणी संशयास्पदरीत्या उभी असलेली बेवारस वाहने पाहायला मिळतआहेत. त्यामध्ये दुचाकींसह कारचाही समावेश आहे. मात्र, संवेदनशील ठिकाणी उभी असलेली वाहने हटवण्याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही.

आवारातच बेवारस वाहनेअन्यथा एखाद्या माथेफिरूकडून अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून या बेवारस वाहनांच्या आडून गुन्हेगारी कृत्य केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पोलीस मुख्यालयासमोरील व आरबीआयच्या आवारातीलच बेवारस वाहने हटवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा संताप सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक