शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खंडित विजेमुळे नागरिकांमध्ये संताप

By admin | Updated: July 16, 2016 02:01 IST

चिरनेर परिसरात रात्री-अपरात्री वारंवार आणि तासन्तास विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

उरण : चिरनेर परिसरात रात्री-अपरात्री वारंवार आणि तासन्तास विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या खेळखंडोब्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सेनेचे तालुका संपर्क प्रमुख संतोष ठाकूर, उरण पं. स. चे सभापती भास्कर मोकल यांच्या नेतृत्वाखाली उरण येथील महावितरण कार्यालयावरच धडक दिली. आठ दिवसांत वीज मंडळाच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.उरण परिसरात वीज गायब होण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात गलथान कारभार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे वीज वाहिन्या तुटल्याचे, तसेच वीज खांब कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. चिरनेर, कोप्रोली आणि ग्रामीण भागातील जीर्ण झालेल्या विद्युत तारा तत्काळ बदलण्यात याव्या, चिरनेरसाठी २५ नवीन विद्युत पोल उपलब्ध करून द्यावेत आणि विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा, याशिवाय जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या व वीज खांब तत्काळ बदलण्यात यावेत, अशा मागण्याही उपस्थित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. आठ दिवसात वीज मंडळाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास आणि मागण्यांची पूर्तता न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. (वार्ताहर)पनवेल : देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७० वर्षे होत आली असली तरी पनवेल तालुक्यातील १० आदिवासी वाड्यांमध्ये अद्याप वीज पोहचू शकलेली नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या तालुक्यातील काही आदिवासी वाड्या आजही अंधारात चाचपडत आहेत. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शेकडो आदिवासी वाड्या आहेत. पैकी सागवाडी, वाघाचीवाडी, नेताली मानपाडा, करवली वाडी, पेंधर आदिवासीवाडी, वलप आदिवासीवाडी, वावंजा आदिवासीवाडी, सांबरमाल,कामतवाडी, कुंडेवहाळ कातकरवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये आजतागायत वीज पोहोचलेली नाही. करवलीवाडीत ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला आहे. मात्र त्यास वनखात्याकडून हरकत घेण्यात आल्याने काम पूर्ण होऊ शकलेले नाही.