शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

भूमिपुत्रांच्या ३५ संघटनांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:36 IST

प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रांमध्ये ३५ संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रांमध्ये ३५ संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली. साडेसात तास सुरू असलेल्या चर्चासत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.आगरी कोळी युथ फाउंडेशनच्यावतीने कोपरखैरणेमधील शेतकरी समाज हॉलमध्ये या चर्चासत्राचे आयोजन केले होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. भूमिपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार संदीप नाईक यांनीही दि. बा. पाटील यांना अपेक्षित प्रकल्पग्रस्तांसाठीच्या हिताची धोरणे शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी श्याम म्हात्रे, मनोहर मढवी, निवृत्ती जगताप, ज्ञानेश्वर सुतार, घनश्याम मढवी, मोरेश्वर पाटील, दीपक पाटील, संजीवन म्हात्रे, सूर्यकांत मढवी, महादेव मढवी उपस्थित होते.गावठाणांचे अस्तित्व या विषयावर विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी अशाप्रकारची चर्चासत्रे नियमित आयोजित केली जावीत.चर्चासत्रामधून ज्या उपाययोजना सुचविल्या जातील त्यांची योग्यपद्धतीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. अ‍ॅड. राहुल ठाकूर यांनीही भूमिपुत्रांच्या समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी माहिती दिली.तब्बल साडेसात तास चर्चासत्र सुरू होते. दिवसभरात ३०० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतल्याची माहिती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनी दिली.