नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून असह्य होणा-या तापमानात अचानक बदल होऊन पावसाने शनिवारी पुन्हा एकदा हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार वा-याचा हा पावसाने नवी मुंबईकरांचीमात्र तारांबळ उडाली. जोरदार पावसाने चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळपासून पावसान्ने कसलीच चाहूल न लागू दिल्याने अचानक आलेल्या ावाने नागरिकांना अडोसा शोधून रक्षण करावे लागले तर बाईक स्वारांनाही वाहन थांबवून अडोशाचा शोध घ्यावा लागला. संध्याकाळपासून जोर धरलेल्या या पावसाने कार्यालातून काम उरकून बाहेर पडणा-या नोकरदारवर्गापुढे प्रश्नचिन्ह उभा केला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या जोरदार पावसाने अनेक परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. सप्टेंबरच्या अखेरपासून उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना मात्र या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यान दिलासा दिला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार या पावसाने कोणत्याही प्रकारचे नुकसान न झाल्याची माहिती दिली.
परतीच्या पावसाचा धुमाकूळ
By admin | Updated: October 3, 2015 23:52 IST