शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तोडगा काढा, अन्यथा परिणामांना सामोरे जा - भाई जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 07:17 IST

ज्यांच्या खांद्यावर आम्ही इतकी वर्षे विश्वासाने मान ठेवली त्यांनीच विश्वासघात करावा, हा मानवतेशी द्रोह आहे. तुम्ही सिडको आणि सरकारचे लाभार्थी, आम्ही धारातीर्थी, असे होऊ देणार नसल्याचे ठामपणे सांगत वाहतूकदारांच्या संपावर तोडगा काढा, अन्यथा होणाºया परिणामांना सामोरे जा, असा सज्जड दम कॉँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी विमानतळ ठेकेदारांना भरला.

पनवेल : ज्यांच्या खांद्यावर आम्ही इतकी वर्षे विश्वासाने मान ठेवली त्यांनीच विश्वासघात करावा, हा मानवतेशी द्रोह आहे. तुम्ही सिडको आणि सरकारचे लाभार्थी, आम्ही धारातीर्थी, असे होऊ देणार नसल्याचे ठामपणे सांगत वाहतूकदारांच्या संपावर तोडगा काढा, अन्यथा होणाºया परिणामांना सामोरे जा, असा सज्जड दम कॉँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी विमानतळ ठेकेदारांना भरला.विमानतळबाधित वाहतूकदारांना योग्य दर देत नसल्याने त्यांनी ओवाळे येथे गेल्या चार-पाच दिवसांपासून न्याय हक्कांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. सोमवारी कॉँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप, जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, विचार सेलचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल कडू, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, पंचायत समिती सदस्या गीता म्हात्रे, नंदू मुंगाजी, तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यात, गुजरातमध्ये विकास भरकटला आहे. तसा रायगडचा विकास वेडा झाला आहे. ही जाहीर सभा नाही. परंतु टोल नाक्याविरु द्ध आंदोलन करायचे आणि पुन्हा ठेका त्यांनीच घ्यायचा, असे किती वेळ फसवत राहणार? असा प्रश्न करून तुमची कुंडली माझ्याकडे आहे, एकपासून शंभरपर्यंत यादी तयार आहे, ती जाहीरसभांमधून योग्य वेळी वाचून दाखवू अशा शब्दात भाजपाच्या स्थानिक नेत्यांची नावे टाळत जगताप यांनी चिरफाड केली.राज्यात भूसंपादनाचा कायदा अस्तित्वात आहे. त्याची पायमल्ली केली जात आहे. सिडको आणि त्यांच्या ठेकेदारांनी त्या कायद्याचा अभ्यास करावा. ज्यांची जमीन गेली आहे, त्यांचा विकास होत नाही. प्रकल्पग्रस्तांचा विकास न झाल्याने त्यांच्यावर आंदोलनाची पाळी येते. आज जर काही पदरात हक्काने पडले नाही तर उद्याची शोकांतिका फार वाईट असेल, असा इशारा दिला. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर त्याच्या भोवती आपल्याला झोपड्या बांधाव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल, असा सावधानतेचा इशारा जगताप यांनी दिला. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई