शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

‘बुलेट ट्रेन’च्या मार्गातील वनजमिनींचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर जमीन रेल्वे काॅर्पोरेशनकडे सुपुर्द

By नारायण जाधव | Updated: July 29, 2023 06:49 IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील एका मागोमाग एक अडथळे राज्य सरकारकडून दूर केले जात आहेत.

नारायण जाधव,लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील एका मागोमाग एक अडथळे राज्य सरकारकडून दूर केले जात आहेत. बुलेट ट्रेनच्या मुंबईतील बीकेसी आणि ठाणे स्थानकांसाठीचा जमिनीचा तिढा सोडविल्यानंतर आता सर्वात  मोठी अडचण असलेल्या वनजमिनींचा अडथळाही दूर करण्यात आला आहे. बुलेट ट्रेनचा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील मार्ग वन जमिनीतून जातो. ती ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन एकनाथ शिंदे सरकारने आता नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडे गुरुवारी सुपूर्द केली आहे.

बुलेट ट्रेनसाठी वनजमीन महाराष्ट्र शासनाने दिल्यानंतर आता नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनचा (एनएचएसआरसीएल) आखणीचा मार्ग सुकर  झाला आहे. ही जमीन कोणत्या भागात आहे, त्यात किती झाडे तोडावी लागणार आहेत, याबाबतचा तपशील  एनएचएसआरसीएलने  आता वृत्तपत्रात प्रसिद्ध करायचा आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यांच्या वेशीवरील तुंगारेश्वर अभयारण्यातून बुलेट ट्रेनचा मार्ग जातो. यामुळे हजारो वृक्षांवर कुऱ्हाड कोसळणार असून, अभयारण्यातील पक्षी, प्राणी यांच्या अस्तित्वावरही गदा येणार आहे. यामुळे ही वन जमीन ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान एनएचएसआरसीएलसमोर होते.

बुलेट ट्रेनसाठी एनएचएसआरसीएलने १३१.३०१९ हेक्टर अर्थात ३२८ एकर २५ गुंठे वन जमीन मागितली होती; मात्र या प्रस्तावाच्या छाननीनंतर राज्याच्या महसूल आणि वन विभागाने १२९.७१९७ हेक्टर अर्थात ३२४ एकर २९ गुंठे वनजमीन देण्यास संमती दिली.

१३५ किलोमीटरचा उन्नत मार्ग 

एनएचएसआरसीएलने यापूर्वीच देशातील समुद्राखालील ७ किलोमीटरच्या बोगद्यासह बीकेसी ते शीळ फाट्यापर्यंतचा २१ किलोमीटर भूमिगत मार्ग बांधण्याचे ६,३९७ कोटी रुपयांचे काम ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्सला दिले आहे. तसेच राज्यातील सर्वात लांब असलेला १३५ किलोमीटरच्या उन्नत मार्गाचे कंत्राट एल ॲण्ड टी कंपनीला दिले आहे. याच मार्गासाठी आवश्यक असलेल्या ३२४ एकर वन जमिनीचा अडथळा आता दूर झाला आहे.

२० एकर ९९ गुंठ्यावर खारफुटीचा समावेश

महाराष्ट्र शासनाने गुरुवारी एनएचएसआरसीएलला ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ८.३९७८ हेक्टर अर्थात २० एकर ९९ गुंठ्यावर खारफुटीचाही समावेश आहे. याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ०.११३८ हेक्टर, ठाणे जिल्ह्यातील ४९.५३४५ हेक्टर म्हणजेच १२३ एकर ८३ गुंठे आणि पालघर जिल्ह्यातील डहाणूची ७१.६७३६ हेक्टर अर्थात १७९ एकर १९ गुंठे वन जमिनीचा समावेश आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनthaneठाणे