शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धर्म, मंदिराच्या राजकारणाने देशात चिंतेचे वातावरण; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 01:39 IST

देशात धर्म, जात व मंदिराच्या नावाखाली शंका व चिंतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे; परंतु देशाची सूत्रे हातात असणाऱ्यांनी चार वर्षांपासून सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने सुरू केला आहे.

कळंबोली : देशात धर्म, जात व मंदिराच्या नावाखाली शंका व चिंतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे; परंतु देशाची सूत्रे हातात असणाऱ्यांनी चार वर्षांपासून सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने सुरू केला आहे. उदात्त भावनेने काम करण्याची सरकारची मनस्थिती नसून, त्यांच्या विरोधात पुरोगारी विचाराच्या सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, धर्म ही वैयक्तिक बाब आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. घराबाहेर आपण वावरतो, तेव्हा भारतीय म्हणून विचार करण्याची गरज आहे. देशात अनेक जाती, धर्माचे लोक राहतात त्या सर्वांना आधार देण्याचे काम सरकारने केले पाहिजे. सरकारने लोकांची सेवा करण्याची भूमिका घेतली पाहिजे; परंतु सद्यस्थितीमध्ये देशाची सूत्रे हातात असणारे उदात्त भावनेने काम करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जात आहे. देशातील बेरोजगारीच्या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. या शक्तीविरोधात पुरोगावी विचारांच्या सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. बाळाराम पाटील यांना त्यांचे वडील दिवंगत शेकापनेते दत्ता पाटील यांचा वारसा मिळाला आहे. दत्ता यांनी लोकहिताच्या प्रश्नावर कधीही तडतोड केली नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. सुनील तटकरे यांनीही बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून पुरोगामी विचार कोकणात पोहोचला असल्याचे मत व्यक्त केले. आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार विवेक पाटील व शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कामोठेमध्ये झालेल्या या कार्यक्रमास आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रेय सावंत, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रवादीचे सतीश पाटील, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, सभापती काशिनाथ पाटील, चंद्रकांत राऊत, कामगार नेते महेंद्र घरत, बबन पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.५५ लाखांचा निधी झोपडपट्टीधारकांसाठी- शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाळाराम पाटील यांना ५५ लाखांचा धनादेश देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले.- या निधीचा वापर झोपडपट्टीधारकांना पंतप्रधान योजनेंतर्गत जे पैसे शासनाला द्यायचे आहेत, त्याकरिता केला जाणार असल्याचे माजी आमदार विवेक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार