शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

कांदा-बटाटा व्यापाऱ्यांना दिलासा; १५ जुलैपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:30 IST

धोकादायक मार्केटचा प्रश्न सोडविण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते.

नवी मुंबई : कांदा-बटाटा मार्केटमधील मोडकळीस आलेल्या मार्केटमधील व्यापार १५ जुलैपर्यंत थांबवू नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मार्केटच्या पुनर्बांधणीच्या विषयावरही मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे.

धोकादायक मार्केटचा प्रश्न सोडविण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला माथाडी नेते नरेंद्र पाटील, बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण, अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके व इतर व्यापारी उपस्थित होते. बाजार समिती प्रशासनाने १ जूनपासून मार्केटमधील कामकाज थांबविण्याची भूमिका घेतली होती. माथाडी व व्यापाºयांच्या विनंतीनंतर १५ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. मार्केटच्या स्थितीविषयी माहिती घेतल्यानंतर व सर्वांची भूमिका समजून घेतल्यानंतर सहकारमंत्र्यांनी पुढील एक महिना मार्केट सुरूच ठेवावे, अशा सूचना प्रशासनास केल्या आहेत. महापालिकेस सांगून मार्केटची दुरुस्ती करून त्याचा वापर केला जाऊ शकतो का हे तपासून पाहावे. यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे एल शेप आकाराचे मार्केट उभारून पुनर्बांधणीची पुढील प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

वाढीव एफएसआयसह विविध विषयांवर या वेळी चर्चा झाली. सुरक्षेच्या दृष्टीने बाजारसमिती प्रशासनाने घेतलेली भूमिकाही योग्यच असल्याचे या वेळी देशमुख यांनी स्पष्ट केले. व्यापाºयांना एक महिन्याचा दिलासा दिला असून, या कालावधीमध्ये पर्यायी व्यवस्था करण्याची सूचनाही दिली आहे. यामुळे मार्केटमधील व्यापाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. याविषयी या पूर्वीच न्यायालयात धाव घेतली आहे. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये न्यायालयाचा निर्णय अपेक्षित असून या विषयी योग्य मार्ग काढणे शक्य होणार आहे.

मार्केटची समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो. मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये एक महिन्याची मुदत वाढवून मिळाली आहे, यामुळे व्यापारी व कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. - राजेंद्र शेळके, अध्यक्ष, कांदा-बटाटा अडतव्यापारी संघ

कांदा-बटाटा मार्केटचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. मंत्रीमहोदयांनी प्रशासनाची भूमिका योग्य असल्याचे सांगितले आहे. व्यापाºयांसाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. पुनर्बांधणीच्या विषयावरही या बैठकीत चर्चा झाली.- सतीश सोनी, प्रशासक, एपीएमसी