शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या चार रस्त्यांना ‘सीआरझेड’चा दिलासा, विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत होणार

By नारायण जाधव | Updated: May 5, 2023 18:42 IST

सिडकोच्या विनंतीवरून विमानतळाचे काम राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सीआरझेड प्राधिकरणाने या चार कामांना १२ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जाेमाने सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०२५ पर्यंत येथून विमानाचे उड्डाण करण्याचा संकल्प विकासक कंपनी आणि सिडकोने सोडला आहे. त्यादृष्टीने या विमानतळास जोडणाऱ्या चार अंतर्गत रस्त्यांची कामे रखडली आहेत. कोविड महामहामारीमुळे त्यांचे काम वेळेत सुरू होऊ शकले नसून सीआरझेड प्राधिकरणाने त्यासाठी दिलेली मुदतही संपली आहे; मात्र आता सिडकोच्या विनंतीवरून विमानतळाचे काम राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सीआरझेड प्राधिकरणाने या चार कामांना १२ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामध्ये १०.३५ हेक्टर खारफुटीने बाधित होणार आहे. या परवानगीमुळे सिडकोस मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई विमानतळाचे काम जोमाने सुरू असले, तरी त्या ठिकाणी जाण्यासाठी सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४-अ आणि ४-ब आणि नियोजित सी लिंकशिवाय दुसरा पर्याय नाही; तसेच ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनेवल महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा महामार्गाने आल्यास विमानतळावर कसे पाेहोचायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सिडकोने चार अंतर्गत रस्ते प्रस्तावित करून ते बांधण्यासाठी ‘सीआरझेड’ची परवानगी घेतली होती; परंतु मधल्या काळात कोविडमुळे कोणतेच काम सुरू होऊ शकलेले नाही. याचदरम्यान ‘सीआरझेड’ने दिलेली परवानगीही संपली. यामुळे सिडकोने तीस मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार राष्ट्रहित लक्षात घेऊन ‘सीआरझेड’ने १२ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली असून केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय आणि सीआरझेडने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून ही कामे करण्याचे बंधन सिडकोस घातले आहे.

हे आहेत ते चार रस्ते -१ - आम्र मार्ग जंक्शन ते विमानतळाच्या उत्तर सीमेपर्यंत सात किलोमीटरचा सहा लेनचा रस्ता प्रस्तावित केला आहे. हा मार्ग प्रामुख्याने विमानतळाशी संबंधित वाहतूक, संरक्षण खाते, कार्गो वाहतूक आणि छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातून ये-जा करण्यासाठी तो उपुयक्त ठरणार आहे; तसेच त्याचा १५ मीटर परिसर भविष्यात मेट्रोला जाेडण्यासाठी केला जाणार आहे. यात ८.१३ हेेक्टर खारफुटी बाधित होणार आहे.

२ - खांदेश्वर रेल्वेस्टेशन ते विमानतळ परिसरातील गाढी नदीच्या फोर्ट कोर्ट परिसराला जोडण्यासाठी एक किमीचा ६० मीटर रुंदीचा तीन लेनचा हा रस्ता बांधण्यात येणार आहे. तो रेल्वे प्रवाशांना विमानतळापर्यंत वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. यात १.०७ हेेक्टर खारफुटी बाधित होणार आहे.

३ - विमानतळ ते आम्र मार्गासह परिसराला जोडणाऱ्या पश्चिम आंतरमार्गिका बांधण्यात येणार आहेत. त्या सुमारे ७.५ हेक्टर जागा व्यापणार आहेत. यामुळे विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत आणि विनाअडथळा धावण्यास मदत होणार आहे. या आंतरमार्गिकांमध्ये यात ०.२० हेेक्टर खारफुटीने बाधित होणार आहे.

४ - विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग ४-बसह इतर महामार्ग आणि परिसराला जोडणाऱ्या पूर्व आंतरमार्गिका बांधण्यात येणार आहेत. त्या तीन लेनच्या राहणार असून सुमारे २० हेक्टर जागा व्यापणार आहेत. यामुळे विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत आणि विनाअडथळा धावण्यास मदत होणार आहे. या आंतरमार्गिकांमध्ये यात ०.९५ हेेक्टर खारफुटी बाधित होणार आहे.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई