शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या ४ रस्त्यांना ‘सीआरझेड’चा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 09:38 IST

१०.३५ हेक्टर खारफुटीला बाधा; विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत होणार

नारायण जाधवनवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जाेमाने सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०२५ पर्यंत येथून विमानाचे उड्डाण करण्याचा संकल्प विकसक कंपनी आणि सिडकोने सोडला आहे. विमानतळास जोडणाऱ्या ४ रस्त्यांच्या कामांना सीआरझेड प्राधिकरणाने १२ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामध्ये १०.३५ हेक्टर खारफुटीने बाधित होणार आहे. या परवानगीमुळे सिडकोस मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४-अ आणि ४-ब आणि नियोजित सी-लिंकशिवाय विमानतळावर पोहोचण्यासाठी दुसरा पर्याय नाही; तसेच ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनेवल महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा महामार्गाने आल्यास कसे पाेहोचायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सिडकोने चार अंतर्गत रस्ते प्रस्तावित करून ते बांधण्यासाठी ‘सीआरझेड’ची  परवानगी घेतली होती; परंतु मधल्या काळात कोविडमुळे कोणतेच काम सुरू होऊ शकलेले नाही. याचदरम्यान ‘सीआरझेड’ने दिलेली परवानगीही संपली. यामुळे सिडकोने मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार राष्ट्रहित लक्षात घेऊन ‘सीआरझेड’ने मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय आणि सीआरझेडने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून ही कामे करण्याचे बंधन सिडकोस घातले आहे.

आम्र मार्ग जंंक्शन ते विमानतळाच्या उत्तर सीमेपर्यंत सात किलोमीटरचा सहा लेनचा रस्ता प्रस्तावित केला आहे. हा मार्ग प्रामुख्याने विमानतळाशी संबंधित वाहतूक, संरक्षण खाते, कार्गो वाहतूक आणि छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. खांदेश्वर रेल्वेस्टेशन ते विमानतळ परिसरातील गाढी नदीच्या फोर्ट कोर्ट परिसराला जोडण्यासाठी एक किमीचा ६० मीटर रुंदीचा  तीन लेनचा हा रस्ता बांधण्यात येणार आहे. तो रेल्वे प्रवाशांना विमानतळापर्यंत वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

विमानतळ ते आम्र मार्गासह परिसराला जोडणाऱ्या पश्चिम आंतरमार्गिका बांधण्यात येणार आहेत. यामुळे विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत आणि विनाअडथळा धावण्यास मदत होणार आहे. विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग ४-बसह इतर महामार्ग आणि परिसराला जोडणाऱ्या पूर्व आंतरमार्गिका बांधण्यात येणार आहेत. त्या तीन लेनच्या राहणार आहेत. यामुळे विमानतळ परिसरातील वाहतूक सुरळीत आणि विनाअडथळा धावण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Airportविमानतळ