शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेडचा विळखा होणार शिथिल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 07:00 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सीआरझेड-२ क्षेत्रामुळे बाधित झालेल्या बांधकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे सीआरझेडच्या कचाट्यात सापडलेल्या शहरातील शेकडो बांधकामांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई  - राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सीआरझेड-२ क्षेत्रामुळे बाधित झालेल्या बांधकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे सीआरझेडच्या कचाट्यात सापडलेल्या शहरातील शेकडो बांधकामांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पामबीच मार्गासह शहराच्या विविध क्षेत्रात सुमारे ११९ इमारती, तसेच गाव-गावठाणातील शेकडो बांधकामांना त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.सिडकोने पामबीच मार्गावर निविदा काढून विकासकांना भूखंड दिले. या भूखंडांच्या विकासासाठी महापालिकेने नियमानुसार बांधकाम परवानगीही दिली. सध्या या इमारती बांधून पूर्ण झाल्या असून, त्यांचा रहिवासी निवासी वापर सुरू आहे. असे असले तरी २०११मध्ये सीआरझेड कायद्यात सुधारणा करून सागरी किनाºयाची मर्यादा वाढविल्याने या इमारती सीआरझेडच्या कात्रीत अडकल्या. त्यामुळे महापालिकेने या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दर्शविला. शहरात अशा प्रकारच्या ११९ इमारती आहेत. त्याशिवाय येथील मूळ २८ गावे सीआरझेड क्षेत्रात मोडतात. तसेच सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप केलेल्या भूखंडांना सीआरझेडचा विळखा पडला आहे. परिणामी, या इमारती अनधिकृत घोषित करण्यात आल्या आहेत. सिडको आणि महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या अनेक विकास प्रकल्पांना सीआरझेड कायद्याचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतून सीआरझेड कायदा शिथिल करावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्य सरकारकडे लावून धरली होती. यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अंशत: यश येताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.पर्यावरण अधिनियम १८५६ नुसार सिडकोने १९ फेब्रुवारी १९९१ रोजी जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये नवी मुंबई क्षेत्रातील समुद्राची उच्चतम भरतीरेषा अर्थात हाय टाइड लाइन (एचटीएल) जाहीर केली होती. त्यानंतर पामबीच मार्गाची निर्मिती करण्यात आली. या पामबीच मार्गाची पश्चिमेकडील बाजू खारफुटी व सीआरझेड क्षेत्रात मोडत असल्याने तेथे कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नाहीत. तर या मार्गाच्या अलीकडील बाजूस मात्र सिडकोने निविदा काढून भूखंडांची विक्री करून करोडो रुपये कमविले. त्या भूखंडावर बांधकाम परवानगी देऊन नवी मुंबई महापालिकेने विकास शुल्कापोटी कोट्यवधी रुपये वसूल केले, असे असताना अचानक सदर भूखंड सीआरझेड क्षेत्र-२मध्ये मोडत असल्याचे कारण सांगत, ११९ इमारतींना नोटिसा बजावून महापालिकेने विकासकांच्या मानगुटीवर एमसीझेडएमएचे भूत बसवून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. याबाबतची खरी परिस्थिती वारंवार राज्याच्या पर्यावरण विभागाच्या निदर्शनास आणूनदेखील पर्यावरण विभागाने अद्याप सीआरझेड क्लिअरन्स दिलेला नाही; परंतु राज्य सरकारनेच यासंदर्भात सकारात्मक पावले उचलल्याने दीर्घकाळ रखडलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महापालिका क्षेत्रातील सर्व गाव-गावठाणे खाडीकिनाºयावर आहेत. त्यामुळे या सर्व गावांचा समावेश सीआरझेडमध्ये येत असल्याने त्याचा फटका प्रकल्पग्रस्तांच्या विकास प्रक्रियेला बसला आहे. ही गावे सीआरझेडमधून वगळावीत, यासाठी मागील तीन वर्षांपासून आपला पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याने हा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- मंदा म्हात्रे,आमदार, बेलापूर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई