शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी केली रुग्णालयाची तोडफोड, नवी मुंबईतील घटनेत चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 06:27 IST

Navi Mumbai News : वाशीतील पालिका रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड करीत, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.

नवी मुंबई : वाशीतील पालिका रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड करीत, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या प्रकरणी वाशी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यात मृत व्यक्तीच्या दोन मुलांचाही समावेश आहे.जुहूगाव येथील व्यंकट सूर्यवंशी (४८) यांना मंगळवारी दुपारी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर आजार असल्याने त्यांना यापूर्वी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या वेळी नातेवाइकांनी यांच्या मृत्यूला रुग्णालय व्यवस्थापनाला जबाबदार धरत त्यांनी रुग्णालयात घुसून काचेचे दरवाजे, टेबल-खुर्च्या यांसह उपचाराच्या अत्यावश्यक उपकरणांची तोडफोड केली. रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण केली. शिवाय आयसीयू विभागात घुसून उपकरणांची तोडफोड केली.दरम्यान, रुग्णालयात उपस्थित पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना मारहाण करत तोडफोड सुरूच होती. त्यापैकी मद्यधुंद अवस्थेतील दोघांच्या हातात शस्त्रे होती, असेही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या घटनेत सफाई कर्मचारी, परिचारिका तसेच डॉक्टर जखमी झाले आहेत. तोडफोड करणाऱ्यांनी एका सहायक पोलीस निरीक्षकाचीही कॉलर पकडून ठार मारण्याची धमकी दिल्याचे समजते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवत चौघांना अटक केली. संदेश सूर्यवंशी, रूपेश सूर्यवंशी, पंकज जाधव व रोहित नामवाड अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण, कामकाजात अडथळा तसेच मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काही वेळासाठी काम बंद करून आपला निषेध व्यक्त केला. रुग्णालयाला  २४ तास बंदोबस्तरुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या तोडफोडीत अत्यावश्यक उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. रुग्ण दगावल्यास डॉक्टर व परिचारिकांना होणाऱ्या मारहाणीमुळे वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयासाठी २४ तास पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल