शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधी पुनर्वसन मगच चौथ्या बंदरांचा विस्तार : संतप्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 22:16 IST

सहा तास जहाज मालवाहतूक ठप्प: कोटींवधींचे नुकसान

मधुकर ठाकूर

उरण : वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे आधी पुनर्वसन करा त्यानंतर चौथ्या बंदरांचा विस्तार करा या मागणीसाठी शुक्रवारी (१) संध्याकाळी संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल रोखुन बंदराची जहाज मालवाहतूक बंद पाडली.ग्रामस्थांनी समुद्रात छोट्या मच्छीमार बोटी आडव्या टाकून अचानक समुद्र चॅनल बंद पाडल्याने जागतिक स्तरावरील जेएनपीए बंदरातील मालवाहू मागील सहा तास बंद पडल्याने खळबळ उडाली आहे.

जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी हनुमान कोळीवाडा गावाची जमीन संपादन करून त्याचे उरण येथील बोरी येथे पुनर्वसन केले आहे.१७ ऐवजी फक्त २ हेक्टर क्षेत्रातच २५६ कुटुंबाचे ३८ वर्षांपूर्वी पुनर्वसन करण्यात आले आहे.मात्र हनुमान कोळीवाडा गावातील २५६ घरांनाच नव्हे तर संपूर्ण गावाला वाळवीने पोखरले आहे.त्यामुळे १७ हेक्टर क्षेत्रावरच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मागील ३८ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.या ३८ वर्षात ५०० हून अधिक बैठका झाल्या मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्याने ग्रामस्थांचा जेएनपीए विरोधात संघर्षच सुरुच आहे. दरम्यान जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पुनर्वसनासाठी विकासित १०.५० हेक्टर जमीन जेएनपीए कामगार वसाहती नजीक देण्याचे मान्य केले आहे.त्याची कार्यवाही सुरू असुन केंद्र सरकारकडे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित आहे.मात्र केंद्र सरकारने या बाबतीत ठोस निर्णय घेतला नसल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. शुक्रवारी (१) जेएनपीए कामगार वसाहतीत चौथ्या बंदरांच्या विस्तारित जेट्टीबाबत जनसुनावणी घेण्यात आली.मात्र पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत जनसुनावणी घेण्यात येऊ नये अशी भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली.मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी २० मच्छीमार बोटींच्या सहाय्याने जेएनपीए बंदराचे समुद्र चॅनल रोखुन ठेवले.

या आंदोलनात सुमारे ५०ते ६० ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.समुद्र चॅनलच बंद केल्याने जागतिक स्तरावरील जेएनपीए बंदरातुन कंटेनर मालाची जहाज मालवाहतूक मागील सहा तासांपासून ठप्प झाली आहे.हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करा त्यानंतर चौथ्या बंदरांचा विस्तार करा अशी ताठर भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.लेखी आश्वासनाखेरीज आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी लोकमतला सांगितले.

आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली.मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली.यामुळे मात्र जेएनपीए अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

टॅग्स :uran-acउरण