शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावांच्या धर्तीवर आमचेही पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:00 IST

गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. याच धरतीवर आमच्या दोन गावांचेही पुनर्वसन करावे, अशी मागणी पारगाव व डुंगी गावांतील ग्रामस्थांनी केली आहे. तशा आशयाचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. 

वैभव गायकर। लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाला सिडकोने सुरु वात केली आहे. पनवेल तालुक्यातील दहा गावे यामुळे पूर्णपणे विस्थापित होणार आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. याच धरतीवर आमच्या दोन गावांचेही पुनर्वसन करावे, अशी मागणी पारगाव व डुंगी गावांतील ग्रामस्थांनी केली आहे. तशा आशयाचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली, वरचा ओवळा, वाघिवली वाडा, गणेशपुरी, उलवा, तरघर, कोंबडभुजे आदी गावे विस्थापित होणार आहेत. या गावांचे पुनर्वसन नव्याने विकसित होणार्‍या पुष्पकनगरामध्ये केले जाणार आहे. पारगाव, डुंगी ही दोन गावे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराला लागून आहेत. विमानतळ प्रकल्पाच्या कामांमुळे या गावांतील ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: या गावांच्या चारही बाजूला भराव झाल्याने भविष्यात पाण्याचा धोका, गावठाण विस्तार, वाढत्या लोकसंख्येचे नियोजन करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. या व्यतिरिक्त प्रस्तावित रस्त्यांची कामे, उलवे खाडीचा मार्ग वळविणे, टेकडीच्या सपाटीकरणासाठी घडविले जाणारे विस्फोट आदीचा परिणाम येथील ग्रामस्थांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडकोने दहा गावांच्या धर्तीवर आमच्या दोन गावांचेही पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी पारगाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन ठरावही पारित केला आहे, अशी माहिती पारगावचे माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी दिली.सध्याच्या घडीला पारगावमध्ये ७0४ घरे आहेत, तर डुंगीमध्ये अवघी ७0 घरे आहेत. २0१५च्या जनगणनेनुसार या गावांची लोकसंख्या जवळपास ३५00 इतकी आहे. या ठिकाणचे क्षेत्रफळ २३३ हेक्टर इतके आहे. ही दोन्ही गावे विमानतळाच्या गाभा क्षेत्राला लागून आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळ प्रकल्पाला भविष्यात बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे दहा गावांच्या धर्तीवर आमचेही पुनर्वसन करावे, असा प्रस्ताव सिडकोला सादर केल्याची माहिती पारगाव येथील ग्रामस्थ सचिन कांबळे यांनी दिली. 

भविष्यात या गावांना पुराचा धोका : पारगाव, डुंगी ही विमानतळाच्या कोअर एरियातील गावे आहेत. गावांच्या दक्षिणेकडे राज्य महामार्गाच्या रुं दीकरणाचे काम प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे गावाच्या उत्तरेकडे किमान ६0 मीटर रुं दीचा रस्ता प्रस्तावित आहे. १00 मीटर अंतरावर विमानतळ असल्याने सुमारे आठ मीटर इतका भराव या ठिकाणी टाकला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या गावांना पुराचा धोका होण्याची भीती अभ्यास गटाने तयार केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

पुनर्वसनासंदर्भात अभ्यासगटाची स्थापनापारगाव, डुंगी या दोन गावांचे सिडकोने पुनर्वसन करावे व गावांतील समस्या, ग्रामस्थांच्या मागण्या यासंदर्भात या ग्रामस्थांनी सात सदस्यीय अभ्यास गट स्थापन केला आहे. या गावातील इत्थंभूत माहिती, पुनर्वसन मागण्यांचा आराखडा, सर्व प्रकारच्या कायदेशीर बाजू, मच्छीमार बांधवांचे प्रश्न यासंबंधीचा अभ्यासपूर्ण आराखडा या अभ्यास गटाने तयार केला आहे. लवकरच सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना हा आराखडा सादर केला जाणार आहे. - महेंद्र पाटील, माजी सरपंच,पारगाव.