शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेबाबत पालिका सदस्य उदासीन

By admin | Updated: February 23, 2016 02:26 IST

आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सोमवारी बोलाविण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बहुतांशी नगरसेवकांची उदासीनता दिसून आली. अर्थसंकल्पाचा

नवी मुंबई : आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सोमवारी बोलाविण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बहुतांशी नगरसेवकांची उदासीनता दिसून आली. अर्थसंकल्पाचा कोणताही अभ्यास न करता आलेल्या बहुतांशी सदस्यांनी गप्प राहणे पसंत केले. काहींचा अपवाद सोडता ज्येष्ठ सदस्यांनी चर्चेत सहभाग न घेतल्याने आजच्या दिवसात अर्थसंकल्पावर कोणतीही सकारात्मक चर्चा होवू शकली नाही. भाजपाचे नगरसेवक रामचंद्र घरत यांनी नागरी सुविधांच्या खर्चात वाढ करावी याकरिता अंदाजपत्रकात १०० ते २०० कोटी रुपयांची वाढ सुचविली. महानगरपालिका क्षेत्रात परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना शहराची ओळख करुन देण्याकरिता पर्यटन विकासावर भर दिला जावा तसेच त्यादृष्टीने विकास करून रेव्हेन्यू वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही घरत यांनी यावेळी सूचित केले. नगरसेविका कोमल वास्कर यांनी जमा-खर्चाची बाजू समतोल राखणारा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला जात आहे.महागाईमुळे विधवा महिलेच्या मुलींच्या लग्नाकरिता देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करणे आवश्यक असल्याचे मतही वास्कर यांनी मांडले. नगरसेविका अ‍ॅड. अपर्णा गवते यांनी विरंगुळा केंद्राच्या खर्चात वाढ करुन जास्तीत जास्त सेवा-सुविधा पुरवाव्यात तसेच ऐरोली आणि बेलापूर विधासभेत दोन वृध्दाश्रम बांधले जाऊन या खर्चात वाढ करावी असे सुचविले. त्याचबरोबर अंगणवाडी विकास योजना, सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर द्यावी, क्षयरोग हिवताप निर्मूलन याकडे अधिक लक्ष केंद्रित केले जावे. नगरसेवकाच्या मानधनात वाढ केली जावी अशीही मागणी गवते यांनी यावेळी केली. कोणतीही करवाढ नसलेला २१ वर्षांतील हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याची स्तुती शिवराम पाटील यांनी केली. (प्रतिनिधी)