शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त देण्यास नकार; सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 17:17 IST

उरण परिसरात सिडकोच्या अख्यत्यारित असलेल्या विभागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत.

मधुकर ठाकूर

उरण : मराठा आरक्षणासाठी सर्वत्र सुरू असलेले आंदोलन आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणास्तव पोलिसांनी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला बंदोबस्त देण्यास असमर्थता दर्शवली.त्यामुळे मोठा लवाजम्यासह उरण परिसरात अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कोणतीही कारवाई न करता माघारी परतण्याची नामुष्कीलीची पाळी आली.

उरण परिसरात सिडकोच्या अख्यत्यारित असलेल्या विभागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. परिसरात झालेल्या अतिक्रमणे हटविण्याची सिडकोच्या अनधिकृत अतिक्रमण विरोधी पथकांकडून ठराविक ठिकाणी आणि ठराविक काळावधीत नेहमीच कारवाई केली जाते.मात्र गरिबांच्या टपऱ्या, दुकाने हटविण्याची कारवाई करणाऱ्या सिडकोने कोणत्याही धनिकांच्या अतिक्रमणावर  कारवाई केली असल्याचे अद्यापही ऐकिवात नाही.मात्र गरिबांच्या टपऱ्या, दुकाने हटविण्याची केलेली कारवाई अगदी क्षणभंगुर ठरते. कारण सिडकोच्या अतिक्रमण विरोधी कारवाई पथकाची पाठ फिरताच पुन्हा त्याच जागी जशाच्या तशा टपऱ्या, दुकाने पुन्हा उभी राहतात.त्यामुळे सिडकोच्या कारवाईच्या लवाजम्यावर लाखो रुपयांचा खर्च अनाठायी ठरतो.याबाबत मात्र सिडकोही गंभीर नसल्याचे जाणवते. 

मंगळवारी (३१) उरण परिसरातील सिडकोच्या अख्यत्यारित असलेल्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी सिडकोचे अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख भरत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी ,ट्रक, सुरक्षा रक्षक, पोलिस असा मोठा फौजफाटा उरणमध्ये दाखल झाला होता.मात्र स्थानिक पोलिसांनी मराठा आरक्षणासाठी सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बळ तैनात केला आहे. त्याशिवाय तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.त्यामुळे आधीच पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कारवाई करण्यासाठी बंदोबस्त देता येणार नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले.मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही पोलिस बंदोबस्त देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली.यावरुन पोलिस व सिडको अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगीही झाली. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे .  प्रथम जबाबदारी असल्याने सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला पोलिस बंदोबस्त देण्यास उरण पोलिसांनी असमर्थता दर्शवली. स्थानिक पोलीसांनीच कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त नाकारल्यामुळे मोठा लवाजम्यासह उरण परिसरात अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कोणतीही कारवाई न करता माघारी परतण्याची नामुष्कीलीची पाळी आली.अतिक्रमणावर कारवाईसाठी पोलिस, सुरक्षा रक्षक बलाची उणीव आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय कारवाई अशक्य असल्याने पथकाला कारवाईविना माघारी परतावे लागले असल्याची माहिती सिडकोचे  संबंधित विभागाचे अधिकारी मनोज काळे यांनी दिली.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई