शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
6
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
7
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
8
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
9
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
10
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
11
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
12
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
13
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
14
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
16
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
17
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
18
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
19
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
20
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

‘सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा’; विधिमंडळ अधिवेशनात मांडली लक्षवेधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:37 IST

या घरांची विक्री करण्यासाठी सिडकोने तब्बल ६९९ कोटींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. त्याचा भार अप्रत्यक्षपणे ग्राहकांवर टाकण्यात आल्याची टीका होत आहे

नवी मुंबई : सिडकोच्या ‘माझे पसंतीचे घर’ योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.  गेल्यावर्षी  विक्रीस काढलेल्या २६ हजार घरांपैकी ६० टक्के घर विक्रीचे उद्दिष्ट सिडकोला पार करता आले नाही. घरांच्या अवाजवी किमतींमुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा  विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेसाठी मांडण्यात आला आहे. 

सिडकोने विक्रीस काढलेल्या २६ हजार घरांपैकी फक्त १० हजार ग्राहकांनी घरांसाठीची पुष्टीकरण रक्कम भरली आहे. त्यामुळे उर्वरित १६ हजार घरे अद्याप विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.  विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी सदर मुद्द्यावर लक्षवेधी उपस्थित करून, घरांच्या किमती तत्काळ २५ ते ३० टक्क्यांनी कमी कराव्यात आणि सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. योजना प्रभावी करण्यासाठी तसेच या घरांची विक्री करण्यासाठी सिडकोने तब्बल ६९९ कोटींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. त्याचा भार अप्रत्यक्षपणे ग्राहकांवर टाकण्यात आल्याची टीका होत आहे. 

१० हजार ग्राहकही गोंधळात पुष्टीकरण रक्कम भरलेले १० हजार ग्राहकही गोंधळात असून, काही बुकिंग रद्द करतील की काय, अशी चिंता सिडकोला सतावत आहे. शिवाय, कर्जासाठी पात्रतेचा मुद्दा अद्याप अनिश्चित असल्याने घर विक्रीचा भविष्यकाळ धूसर आहे.

१६ हजार घरे विक्रीविना ‘माझे पसंतीचे घर’ या गृह योजनेत घर विक्रीचे किमान ६० टक्के  उद्दिष्ट होते; परंतु प्रत्यक्ष प्रतिसाद ३८ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. विशेष म्हणजे सोडतीत समाविष्ट केलेल्या २१ हजार ग्राहकांपैकी ११ हजार ग्राहकांनी पुष्टीकरण दिलेले नाही. तर उर्वरित ५००० घरे सोडतीच्या बाहेरच राहिली. सध्या एकूण १६ हजार घरे विक्रीविना पडून आहेत.

टॅग्स :cidcoसिडको लॉटरी