शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

धोकादायक घरांचा पुनर्विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:14 IST

येथील केएल टाईपची घरे मोडकळीस आली आहेत. या घरांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. इमारतींची नियमितपणे पडझड सुरू आहे.

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : येथील केएल टाईपची घरे मोडकळीस आली आहेत. या घरांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. इमारतींची नियमितपणे पडझड सुरू आहे. या घरांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने अतिरिक्त एफएसआय मंजूर केला आहे. परंतु सिडको आणि महापालिकेच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न रखडला आहे. शेकडो कुटुंबे मोडकळीस आलेल्या या घरांमध्ये जीव मुठीत घेवून जगत आहेत.कळंबोलीत सिडकोने केएल-२ आणि केएल-४ टाईपच्या बैठी घरे बांधल्या आहेत. परंतु काही वर्षातच या इमारती निकृष्ट ठरल्या आहेत. पावसाळ्यात भिंतीला तडे जाणे, प्लास्टर निखळणे, छतातून पाणी गळणे आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी घरांची पडझड सुरू असल्याने रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. या घरांची पुनर्बांधणी करण्याबाबत १९९0 पासून येथील रहिवाशांचा संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु आश्वासनाच्या पलीकडे येथील रहिवाशांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे येथील रहिवासी संतप्त झाले आहेत.मध्यंतरीच्या काळात सिडकोने येथील घरांची जुजबी डागडुजी केली. परंतु तीसुध्दा तकलादू ठरल्याचे दिसून आले आहे. त्यावर उपाय म्हणून या सर्व घरांची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. १९९२ मध्ये येथील रहिवासी आत्माराम पाटील यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार राज्य शासनाने यासंदर्भात चार वेळा अध्यादेश काढले. सूचना व हरकतीही मागविण्यात आल्या. परंतु कार्यवाही काहीच झाली नाही. त्यानंतर २0१३ मध्ये येथील दोन्ही टाईपच्या घरांचे संरचनात्मक अहवाल तयार करण्यात आला. यात येथील सर्व घरे धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले होते.असे असले तरी सिडकोने केवळ ९५ सदनिकाच धोकादायक असल्याचे जाहीर करून येथील रहिवाशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आॅडिट रिपोर्टच्या अहवालावरून काही इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिका धोकादायक यादी समाविष्ट करण्यात आल्या. परंतु त्याच इमारतीतील तळमजल्यावरील सदनिका मात्र राहण्यास योग्य असल्याचे नमूद केले. यावरून रहिवाशांत नाराजी पसरली आहे.