शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी; चार कोटीचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 04:33 IST

जेएनपीटी बंदरातून दोघांना अटक

उरण : जेएनपीटी बंदरातून न्हावा- शेवा डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी छापा टाकून १३ मेट्रिक टन रक्त चंदनाच्या साठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत चार कोटीच्या घरात आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने शारजात निर्यात करण्याच्या तयारीत असतानाच हा माल पकडण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.जेएनपीटी बंदरातून एका कंटेनर कार्गोमधुन शारजा-युएई येथे २९ मेट्रिक टन कांदा पाठविण्यात येणार होता. तशी कागदपत्रेही तयार करण्यात आली होती. मात्र कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने दुर्मीळ रक्तचंदनाची तस्करी करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती न्हावा-शेवा येथील डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. खबºयांकडून बातमी मिळाल्यानंतर डीआरआय विभागाच्या अधिकाºयांनी छापा टाकून संशयित कंटेनर कार्गोची तपासणी केली. या तपासणीत २९ मेट्रिक टनाऐवजी फक्त १७ टन कांदा आढळून आला. तर कंटेनरमध्येच कापडात गुंडाळून लपवुन ठेवलेला १३ मेट्रिक टन रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या रक्तचंदनाच्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चार कोटीच्या घरात आहे. याप्रकरणी डीआरआय अधिकाºयांनी रक्तचंदनाची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाºया दोन संशयितांना अटक केलीे. त्याना तपासणीसाठी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अधिकाºयांकडून कसून तपासणी सुरू असल्याने सीएफएसचे नाव उघड करण्यास डीआरआय अधिकाºयांनी नकार दिला.