शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
3
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
4
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
5
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
6
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
7
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
8
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
9
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
10
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
11
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
12
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
13
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
14
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
15
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
16
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
17
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
18
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
19
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
20
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

मनपाचा महसूल संकलनाचा विक्रम

By admin | Updated: February 18, 2017 06:39 IST

महानगरपालिकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये महसूल संकलनाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. २०२४ कोटी रुपयांचा

नामदेव मोरे / नवी मुंबईमहानगरपालिकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये महसूल संकलनाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. २०२४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. डिसेंबरपर्यंत तब्बल १६८५ कोटी रुपये जमा झाले असून मार्चअखेरपर्यंत तब्बल २२९५ कोटी रुपये महसूल जमा होणार आहे. पालिकेने २२ वर्षांमध्ये प्रथमच अर्थसंकल्पातील उद्दिष्ट साध्य केले आहे. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेमध्ये रूपांतर झालेली नवी मुंबई ही देशातील एकमेव पालिका आहे. १९९२मध्ये पालिकेची स्थापना झाली असली, तरी प्रत्यक्षात १९९५-९६मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पहिल्याच वर्षी ७९ कोटी ३४ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले; पण प्रत्यक्षात फक्त १८ कोटी ५८ लाख रुपयेच जमा झाले. निर्धारित उद्दिष्टापेक्षा ६० कोटी कमी महसूल मिळाला. तेव्हापासून ते २०१५-१६पर्यंत एकदाही अर्थसंकल्पातील निर्धारित उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. पालिकेची श्रीमंती दाखविण्यासाठी न मिळणारे उत्पन्नाचे आकडे दाखवून अर्थसंकल्प फुगविण्याची स्पर्धाच सुरू झाली. आयुक्तांनी गतवर्षीपेक्षा वाढीव रकमेचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करायचा, स्थायी समितीने त्यामध्ये काही कोटी रुपयांची वाढ सुचवायची व महासभेनेही प्रथेप्रमाणे आकडा वाढवून अर्थसंकल्प जाहीर करण्यात येत होता. वर्षअखेरीस उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने नवीन अर्थसंकल्प सादर करताना मागील वर्षीच्या सुधारित अर्थसंकल्पालाही मंजुरी देण्यास सुरुवात झाली. मूळ अर्थसंकल्पापेक्षा सुधारितचा आकडा कमी असला तरी त्याकडे कोणाचेही फारसे लक्ष जात नसल्याने वर्षानुवर्षे हा आकडे वाढविण्याचा खेळ सुरूच राहिला. या प्रथेला बगल दिली ती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी. गतवर्षी आकडेवारी न वाढविता २०२४ कोटी रुपयांचा वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यांची बदली झाल्यानंतर विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ८ महिने कडक उपाययोजना राबवून अर्थसंकल्पातील उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल जमा केला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून उत्पन्नवाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मालमत्ता कर विभागातील अनागोंदी व एकाधिकारशाही संपुष्टात आणली. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. थकबाकीदारांविरोधात कडक कारवाई सुरू करण्यात आली. एलबीटी विभागाचे उत्पन्न वाढविण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले. याशिवाय फुकटे जाहिरातदार व परवाना विभागापासून सर्वच ठिकाणची करगळती रोखण्यावर विशेष भर देण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा डिसेंबरमध्येच अर्थसंकल्पातील उद्दिष्ट साध्य झाले आहे. पुढील चार महिन्यांसाठी मूळ उद्दिष्टामध्ये वाढ करून ते २२९५ कोटी करण्यात आले असून, हा महसूलवाढीचा आतापर्यंतचा उच्चांक असणार आहे. वाघमारे यांचा वास्तववादी दृष्टिकोन महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी २०१६ - १७ या आर्थिक वर्षासाठी वास्तववादी अर्थसंकल्प सादर केला होता. यापूर्वीचा अर्थसंकल्प १९५६ कोटींचा असताना त्यांनी फक्त १९७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समिती व महासभेने वाढ करून अंतिम २०२४ कोटीला मंजुरी दिली होती. आकड्यांचा खेळ करून वास्तव लपविण्याची प्रथा त्यांनी बंद केली. याशिवाय त्यांच्या कार्यकाळात अनावश्यक खर्चावरही नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम आता दिसू लागला असून पहिल्यांदा उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल जमा होऊ शकला आहे. उत्पन्नवाढीचा मुंढे पॅटर्न महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे व आक्रमक भूमिकेमुळे २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये विक्रमी महसूल संकलित होऊ शकला आहे. २२ वर्षांमध्ये मूळ अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट पहिल्यांदा डिसेंबरमध्येच पूर्ण झाले आहे. दरवर्षी सुधारित अर्थसंकल्पामध्ये आकडे कमी करावे लागत होते. करगळती थांबवून थकबाकीदारांवर व निष्काळजी करणाऱ्या कर्मचारी,अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे हे उद्दिष्ट साध्य झाले आहे. केलेल्या उपाययोजना च्एलयूसीसह एकूण ३,७०,७१० मालमत्तांना कर आकारणीच्एलबीटी थकबाकी वसुलीसाठी ९५६ बँक खाती गोठविलीच्अभय योजनेमध्ये आलेल्या ७,५०२ अर्जांपैकी ५,२०६ अर्जांची करनिर्धारणा पूर्ण