शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

नवी मुंबईत विक्रमी रक्त तपासणी

By admin | Updated: November 7, 2015 03:47 IST

पालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयामध्ये ३०० बेडची क्षमता असताना दोन महिन्यांपासून सरासरी ४२५ रूग्ण भरती होवू लागले आहेत. रक्ततपासणीसाठी फक्त १८ तज्ज्ञ कर्मचारी

नवी मुंबई : पालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयामध्ये ३०० बेडची क्षमता असताना दोन महिन्यांपासून सरासरी ४२५ रूग्ण भरती होवू लागले आहेत. रक्ततपासणीसाठी फक्त १८ तज्ज्ञ कर्मचारी असून महिन्याला तब्बल पावणेदोन लाख तपासण्या केल्या जात आहेत. रूग्णांची वाढती संख्या व त्याप्रमाणात मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडू लागला आहे. नवी मुंबईमधील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शहरात दोन महिन्यांपासून तापाची साथ सुरू असून उपचारासाठी महापालिकेकडे पुरेशी सुविधाच नाही. पालिकेची चारही माताबाल रूग्णालये जवळपास बंद अवस्थेमध्येच आहेत. सर्व भार वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयावर पडत आहे. हॉस्पिटलची बेडमर्यादा ३०० आहे. परंतु रूग्णांची संख्या वाढल्यामुळे सद्यस्थितीमध्ये रोज ४०० ते ४२५ रूग्ण भरती केले जात आहेत. अत्यंत दाटीवाटीने बेड ठेवून उपचार सुरू आहेत. नाईलाजाने अनेक रूग्णांना दुसऱ्या रूग्णालयात पाठवावे लागत आहे. यामुळे नाराज झालेले नातेवाईक व लोकप्रतिनिधींच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. रूग्णांची संख्या वाढली असली तरी त्या प्रमाणात कर्मचारी नाहीत. यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना ८ ऐवजी १२ तास किंवा जास्त वेळ काम करावे लागते. अनेकांना महत्त्वाच्या कामासाठीही सुट्टी घेता येत नाही. पालिका रूग्णालयामध्ये बाह्य रूग्ण विभागात पूर्वी १ हजार ते बाराशे रूग्ण यायचे. परंतु जुलैपासून रोज सरासरी १८०० ते २ हजार रूग्ण येत आहे. शहरात तापाची साथ सुरू आहे. डेंग्यू व मलेरियाचे रक्ततपासणीसाठी व इतर तपासण्या करण्यासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. पालिका रूग्णालयामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी १८ टेक्निशियन आहेत. महिन्याला जवळपास पावणेदोन लाख प्रकारच्या तपासण्या हे कर्मचारी करत आहेत. प्रत्येकाला जवळपास दुप्पट काम करावे लागत आहे. डॉक्टर, परिचारिका या सर्वांवरील ताण प्रचंड वाढला आहे. रूग्णालयामधील गर्दी आटोक्यात आणताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय नागरिक, रूग्णांचे नातेवाईक, लोकप्रतिनिधी यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक जण डॉक्टर व इतर अधिकाऱ्यांशीही उद्धट वर्तन करू लागले आहेत. आयसीयू, एनआयसीयू युनिटमध्ये जागा नसल्याने खाजगी रूग्णालयात किंवा मुंबई महापालिकेच्या रूग्णालयामध्ये पाठवावे लागत आहे. कर्मचाऱ्यांवरील ताण दूर व्हावा व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नुकताच संप केला होता. प्रशासनाने तत्काळ नवीन रूग्णालये सुरू करावी. वाशी रूग्णालयामध्ये आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन व अधिकारी, कर्मचारी संघटनेने पालिका रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष जावे यासाठी नुकतेच आंदोलन केले होते. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष रमाकांत पाटील, सरचिटणीस राजेंद्र चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या आंदोलनाची दखल घेवून मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार, जगन्नाथ सिन्नरकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येवून सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून सर्व प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीही शहरवासीयांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना केल्या असून जादा काम करणाऱ्यांना त्याचा मोबदला देण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत.