शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
2
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
3
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
4
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
5
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
6
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
7
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
8
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
9
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
10
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
11
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
12
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
13
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
14
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
15
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
16
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
17
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
18
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
19
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
20
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?

खारघरमध्ये ७९२ तास गायनाचा विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:20 IST

८०० कलाकारांचा सहभाग : २२ डिसेंबरपर्यंत ८९५ तासांचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : राष्ट्रीय एकात्मता, बेटी बचाव बेटी पढाव, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कॅम्पस विथ हेल्मेट, सेव्ह वॉटर, रक्तदान या ज्वलंत सामाजिक विषयांच्या प्रचारासाठी खारघर शहरातील लिटलवर्ल्ड मॉलमध्ये गीतगायनाचा उपक्रम सुरू आहे. बुधवारी सलग गायनाच्या चीनच्या ७९२ तास दोन मिनिटांचा विक्रम मोडीत काढून भारताच्या नावावर नवीन विश्वविक्र माची नोंद करण्यात आली. या संगीत मैफिलीमध्ये आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त गायकांनी सहभाग घेतला.

विराग मधुमालती ग्रुपच्या माध्यमातून १५ नोव्हेंबरपासून ही संगीत मैफील सुरू आहे. देशभरातील विविध कानाकोपऱ्यातील गायक, संगीतप्रेमी सहभागी होत आहेत. यामध्ये देशभरातील विविध राज्यांतील गायकांनी सहभाग घेतला. यामध्ये दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आदीसह वेगवगेळ्या ठिकाणच्या संगीतप्रेमींनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये मराठी, हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांचा संगीत गीतांचा सहभाग आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्डरेकॉर्डमध्ये आजतागायत सलग ७९२ तास गायनाच्या विक्र माची नोंद चीन देशाच्या नावावर होती. या उपक्र मात सहभागी झालेल्या गायकावर नजर ठेवण्यासाठी चार कॅमेरे तसेच प्रत्येक सेकंदाची नोंद करण्यासाठी निरीक्षक या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत ९५०० पेक्षा जास्त विविध प्रकारची गीते या ठिकाणी गायली गेली आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, आसामी, राजस्थानी, पंजाबी आदीसह विविध प्रकारच्या गीतांचा सामावेश होता. २२ डिसेंबरपर्यंत ही मैफील सुरू राहणार असून, ८९५ तास न थांबता गायनाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला जाणार आहे. शेवटच्या दिवशी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम या ठिकाणी हजर राहणार आहेत. आतापर्यंत ८०० गायकांनी सहभाग घेतला असून, शेवटच्या दिवसापर्र्यंत ११०० पेक्षा जास्त गायक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा विश्वविक्रम पूर्ण करण्यासाठी विराग वानखेडे, वंदना वानखेडे, रीना अग्रवाल, राहुल सोनावणे आदी परिश्रम घेत आहेत.

विश्वविक्रमासोबत समाजजागृतीहीच्या उपक्र मांतर्गत बेटी बचाव बेटी पढाव, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कॅम्पस विथ हेल्मेट, सेव्ह वॉटर, रक्तदान यासंदर्भातही जनजागृती केली जात आहे. त्यानुसार मंचावर या विषयावरील जनजागृतीचे पोस्टर लावले जात आहेत.च्या उपक्र माचे आयोजक विराग मधुमालती यांच्या नावावर आजतागायत सुमारे चार जागतिक विश्वविक्र माची नोंद करण्यात आली आहे. हे विक्र म राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृतीसाठी समर्पित करण्यात आले आहेत.