शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी यंत्रणा सज्ज; ३० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 03:13 IST

विमानतळाच्या कामाच्या भूमिपूजनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच नवी मुंबईत येत आहेत. त्यानुसार सिडकोसह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी चालवली आहे. या कार्यक्रमासाठी तीस हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता असल्याने संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : विमानतळाच्या कामाच्या भूमिपूजनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच नवी मुंबईत येत आहेत. त्यानुसार सिडकोसह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी चालवली आहे. या कार्यक्रमासाठी तीस हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता असल्याने संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्टÑीय विमानतळाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानुसार या कार्यक्रमाची जय्यत तयारी सिडकोसह रायगड जिल्हाधिकारी व नवी मुंबई पोलिसांनी चालवली आहे. कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदरच पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान प्रथमच नवी मुंबईत येणार असल्याने ३० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता आहे. त्यांची अनेक ठिकाणी तपासणी करुनच प्रेक्षक दालनापर्यंत सोडले जाणार आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने बॉम्ब शोधक पथकामार्फत संपूर्ण परिसराची चाचपणी करण्यात आलेली आहे. शिवाय कार्यक्रमाच्या काही तास अगोदर देखील पुन्हा सुरक्षेची खातरजमा केली जाणार आहे. यामुळे प्रेक्षकांना सोबत कोणतीही वस्तू घेवून येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची पिशवी, बाटली यासह मोबाइलला देखील प्रतिबंध करण्यात आला आहे.पंतप्रधानांच्या आगमनाकरिता तीन हेलिपॅड तयार करण्यात आले असून त्या परिसरात सर्वसामान्यांना प्रवेशबंदी आहे. गेली अनेक वर्षांपासून विमानतळाच्या कामाच्या सुरु असलेल्या प्रक्रियेला मागील सात महिन्यात अधिक गती देण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाचे भूमिपूजन केले जात आहे. नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातून प्र्रेक्षक उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. यादरम्यान वाहतूककोंडी होवू नये याची खबरदारी वाहतूक पोलिसांनी घेतली आहे.- अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांची वाहने किल्ला जंक्शन येथून कोंबडभुजे गावाच्या रस्त्यावरुन कार्यक्रमस्थळाकडे सोडली जाणार आहेत.- प्रेक्षकांना उलवे गावाकडून जाणाºया रस्त्यानजीकचा टीआरपीएल कंपनीच्या रस्त्यावरुन प्रवेश दिला जाणार आहे. त्याठिकाणच्या मैदानावर प्रेक्षकांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे.- उलवे गावातून दुचाकी वाहनांसाठी पार्किंगच्या स्थळापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे.- कोकण, पुणे, पनवेल, उरण येथून कार्यक्रमासाठी येणाºया वाहनांना जुना पनवेल - उरण मार्गाने दापोली-पारगाव-डुंगी-खालचा ओवळा मार्गाने कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग स्थळापर्यंत येवू शकतात.- आम्रमार्ग ते उरण फाटा मार्गाने ये-जा करणाºया जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर उरण फाटा येथून आम्रमार्गावरुन जेएनपीटीकडे जाणाºया जड, अवजड वाहनांना प्रवेशबंदी करुन ती सीबीडी-कळंबोली मार्गे वळवण्यात आली आहेत.- गव्हाण फाट्याकडून किल्ला जंक्शनकडे ये-जा करणाºया वाहनांना प्रवेशबंदी करुन ती पर्यायी गव्हाण फाट्याकडून डी पॉर्इंट मार्गे कळंबोली सर्कलकडे वळवली आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी