शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

आपत्तींशी लढण्यासाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: July 5, 2015 03:52 IST

पावसाळ्यामध्ये आपत्तींशी सामना करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. शहरात ११ ठिकाणी पुराचे पाणी शिरण्याची भीती आहे. ८ झोपडपट्ट्यांमध्ये भूस्खलन

नामदेव मोरे, नवी मुंबईपावसाळ्यामध्ये आपत्तींशी सामना करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. शहरात ११ ठिकाणी पुराचे पाणी शिरण्याची भीती आहे. ८ झोपडपट्ट्यांमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असून संबंधितांना खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणच्या बेघरांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले असून आपत्तीशी लढण्यासाठी नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये २६ जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर नवी मुंबईतील जनजीवन सर्वात प्रथम पूर्वपदावर आले होते. शहराच्या नैसर्गिक रचनेप्रमाणेच महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेमुळे हे शक्य झाले होते. तेव्हापासून महापालिकादर वर्षी पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करते. यावर्षीही आराखडा तयार केला आहे. शहरात ११ ठिकाणी पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. सानपाडा व इतर ठिकाणी पाणी साचणाऱ्या ठिकाणी बेघर नागरिक तंबू टाकून राहत होते. त्यांना तेथून हलविण्यात आले असून उंचावर जागा पाहून राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. २६ जुलैच्या अतिवृष्टीमध्ये व गतवर्षी दरड कोसळून अपघात झाल्याने काही जणांचा मृत्यू झाला होता. पालिका प्रशासनाने मे महिन्यामध्येच दगडखाणीमधील रहिवाशांना संभाव्य धोक्याची सूचना दिली आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे, तेथील नागरिकांना इतरत्र स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील ४९ झोपडपट्ट्यांमध्येही घरे कोसळणे व इतर अपघात होण्याची भीती आहे. विभाग कार्यालयांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. ठाणे-बेलापूर रोड, पामबीच रोड, सायन - पनवेल महामार्ग, एमआयडीसी, उरण जंक्शन व महामार्गावर सीबीडीमध्ये अपघातजन्य ठिकाण घोषित करण्यात आले आहे. मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय व सर्व प्रमुख कार्यालये हॉटलाईनने जोडण्यात आली आहेत. बेलापूर, नेरूळ, वाशी व ऐरोली अग्निशमन केंद्रांमध्ये व सर्व विभाग कार्यालयांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत. सर्व नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहेत. पालिकेने दोन शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार केले आहेत. आपत्कालीन काळात संपर्क साधण्याची यंत्रणाटोल फ्री नंबर १८००२२२३०९ / १८००२२२३१०, तत्काळ कृती केंद्र - २७५६७०६० / ६१/ ६२, बेलापूर अग्निशमन केंद्र - २७५७२१११, नेरूळ अग्निशमन केंद्र - २७७०७१०१, वाशी अग्निशमन केंद्र - २७६६०१०१, ऐरोली अग्निशमन केंद्र - २७७९६६००, नियंत्रण कक्ष परिमंडळ १ - २७८९४८०० / २७८९५९००, नियंत्रण कक्ष परिमंडळ २ - २७७९२४०० / २७७९५२००भूस्खलन होण्याची शक्यता असलेली ठिकाणेप्रभाग - ठिकाणबेलापूर - दुर्गामाता झोपडपट्टी नेरूळ - महात्मा गांधी झोपडपट्टी, रमेश मेटल क्वॉरीतुर्भे - इंदिरानगर झोपडपट्टीघणसोली - रबाडे भीमनगर, अश्विन क्वॉरी, आंबेडकर नगर झोपडपट्टीदिघा - इलठाणपाडा झोपडपट्टीपावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांना इतर ठिकाणी हलविले आहे. भूस्खलन होण्याची शक्यता असणाऱ्यांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे. आपत्कालीन नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी सर्व साधनसामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. - जगन्नाथ सिन्नरकर, उपआयुक्त, आपत्ती व्यवस्थापन आपत्कालीन यंत्रणेवर आयुक्तांचे लक्ष महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. शहरातील पोलीस, सिडको, एमआयडीसी, उद्योजक संघटना, एनजीओ सर्वांच्या बैठका घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. दुर्घटना होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आपत्ती घडलीच तर तत्काळ मदत उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या असून सर्व गोष्टींवर स्वत: आयुक्त लक्ष देत असल्याने कर्मचारीही दक्ष आहेत.