शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

निवडणूक यंत्रणा सज्ज, कर्मचाऱ्यांच्या वाहनांना जीपीएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:51 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचालींना गती मिळाली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचालींना गती मिळाली आहे. त्यानुसार रविवारी सकाळी सर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व मतपेट्या पोहोचणार आहेत, यानुसार त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर शनिवारी संध्याकाळी थंडावल्या. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी ऐरोली विधानसभा क्षेत्रात ७१ केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यामधील ४५२ बूथवर मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्येक बूथवर एक हजार ते १२०० मतदारांचे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, अनेक बूथवरील मतदारांचा आकडा दीड हजारांच्या वर जात आहे. त्यामुळे मूळ ४३३ बूथमध्ये अधिक १९ बूथची भर पडलेली आहे. त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ऐरोली विधानसभा क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांना ऐरोलीतील सरस्वती विद्यालयाच्या आवारातून निश्चित मतदान केंद्राकडे पोलीस सुरक्षेत मतपेट्यांसह रविवारी सकाळी रवाना केले जाणार आहे.

त्यानुसार शनिवारी रात्रीपासूनच सर्व मतदान केंद्रांच्या इमारतीभोवती पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान कर्मचाºयांवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाऊ नये, या उद्देशाने त्यांच्या वाहनांमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहेत. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकाºयाच्या वापरासाठी असलेल्या कारसह कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या बसचाही समावेश आहे.

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी दुपारी ऐरोली विधानसभा क्षेत्रातील या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. या दरम्यान निवडणूक अधिकारी नीलिमा सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर टेबल-खुर्चींसह इतर आवश्यक साहित्य पुरवण्यात आले असून, काही ठिकाणी मतदारांना सावलीसाठी मंडप उभारण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. महिन्याभरात अनेक कोम्बिंग ऑपरेशनद्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सराईत गुन्हेगारांना तडीपार करणे, अवैध शस्त्र जप्ती अशा कारवाया केल्या आहेत. मतदानाच्या दिवशीही शहरात चोख बंदोबस्त राहणार आहे.

मतदान केंद्राच्या आवारात १०० मीटरवर प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्या ठिकाणी केवळ निवडणूक अधिकारी व कर्मचारी, मतदार, उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी गस्ती पथकेही सक्रिय राहणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग