शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

नवी मुंबई विमानतळावरून ठाणे गाठा ४५ मिनिटांत, सिडको बांधणार २६ कि.मी.चा उन्नत मार्ग, ८००० कोटींचा खर्च अपेक्षित

By नारायण जाधव | Updated: March 30, 2025 10:05 IST

CIDCO News: येत्या जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमानोड्डाण करण्याचा संकल्प सिडकोने साेडला आहे. या विमानतळाची मुंबईसह ठाणे आणि परिसराशी कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी यासाठी सिडकोसह एमएमआरडीएने कंबर कसली आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई - येत्या जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमानोड्डाण करण्याचा संकल्प सिडकोने साेडला आहे. या विमानतळाची मुंबईसह ठाणे आणि परिसराशी कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी यासाठी सिडकोसह एमएमआरडीएने कंबर कसली आहे. यानुसारच अटल सेतूने राजधानी मुंबईला या विमानतळाशी जाेडल्यानंतर ठाणे शहरही विमानतळाला जोडण्यासाठी सिडको २६ कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग बांधणार आहे. त्याचा डीपीआर तयार करून व्यवहार सल्लागाराचा शोध सुरू केला आहे.

ठाणे शहराला नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी सध्याचा ठाणे-बेलापूर मार्ग आणि पाम बीच मार्गाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. मात्र, या दाेन्ही मार्गांवरील वाहतूक लक्षात घेता झटपट विमानतळावर पोहोचण्यासाठी सिडकोने ठाण्याहून थेट विमानतळापर्यंत विनाअडथळा पोहोचण्यासाठी हा २६ कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित केला आहे. ठाण्याच्या वेशीवरील पटनी चौक ते वाशीपर्यंत खारफुटीचा फारसा अडथळा नसला तरी वाशी ते विमानतळापर्यंतच्या डबल डेकर रस्त्याच्या मार्गात अनेक ठिकाणी खारफुटी आणि सीआरझेड क्षेत्र बाधित होणार आहे. त्याच्या परवानग्यांचा अडथळा सिडकोला पार करावा लागणार आहे. 

असा असेल नवा मार्गसिडकोने प्रस्तावित केलेल्या २६ कि.मी. उन्नत मार्गाची सुरुवात ही दिघ्यातील पटणी चौकापासून होणार आहे. त्याचा पहिला टप्पा वाशीपर्यंत १७ कि.मी. राहणार असून, तो ठाणे-बेलापूर मार्गाला समांतर असेल. पुढे वाशी ते नवे विमानतळापर्यंतचा ९ कि.मी.चा मार्ग हा उन्नतच असून, मात्र दुमजली बांधण्याचे नियोजन आहे. या मार्गावर अंदाजे ८००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

वनजमिनीचा अडथळा दूरनवी मुंबई विमानतळाला सर्व बाजूंनी जोडण्यासाठी सिडकोने विविध रस्ते आणि पूल प्रस्तावित केले आहेत. आता अन्य एका रस्त्यासाठी उलवे नदीवरील बंधारा तोडून पूल बांधण्यासाठी उलवे आणि सोनखार खाडीनजीकची ४८५९ चौरस मीटर वनजमीन वळती करण्यास वनविभागाने २५ मार्च रोजी मंजुरी दिली.  

टॅग्स :cidcoसिडको लॉटरीNavi Mumbaiनवी मुंबईthaneठाणे